रायगडावरील धनगर समाजाची वस्ती हटवीण्याची कारवाई तात्काळ थांबवा,

 रायगडावरील धनगर समाजाची वस्ती हटवीण्याची कारवाई तात्काळ थांबवा,                                                        अन्यथा रस्त्यावर उतरू, राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : १३ मे,


              रायगड किल्यावर असलेल्या धनगर समाजाच्या घरांना वनविभागाने नोटीस देऊन ही घरे  हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, ही मोहिम  तात्काळ थांबवावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशाने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे  केली आहे.
             छत्रपती शिवाजी माहाराजांच्या काळापासून  या रायगड किल्यावर धनगर समाजाची वस्ती आहे, येथे एकूण २५ घरे आहेत,तेथे येथील गोर गरीब नागरिकांचे पर्यटनांवर उपजिविकेचे साधन असून येथे आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत,मात्र त्यांना अजून पर्यंत कोणत्याच सरकारने नोटीसा दिल्या नसून आता मात्र पुरातन विभाग आणि वनविभागाने नवीन उपक्रम हाती घेत या घरांना नोटीसा देऊन घरे हटविण्याची  मोहीम हाती घेतली असल्याने याला राष्ट्रीय समाज पक्षाने कडाडून विरोध केला आहे.ही कारवाई तात्काळ थांबवावी अश्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविल्याचे माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी दिले आहे.
              नुकताच रायगड किल्लावर असलेल्या वाघ्या कुत्राचा पुतळा हटविण्याची मोहीम हाती घेतली असून तिला महाराष्ट्रातील धनगर समाजाने कडाडून विरोध केल्याने ती मोहीम आता शांत झाली असल्याने नव्याने वनविभागाने हे अतिक्रमन  हटविण्यांचे काम हाती घेतल्याने रायगड जिल्ह्यातील धनगर समजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करण्यांत येइल असा इशारा राष्ट्रीय समाज  महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी दीला आहे,

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर