तहानलेल्या पशु साठी अनेक ठिकाणी मिळणार फ्री वॉटर बाऊल,वॉटर फॉर व्हॉइसलेस या संस्थेचा पुढाकार
माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : २४ मे,
पाणी हे जिवन असे म्हटले जाते.आपणांस तहान लागली की आपण विकत किंवा पाणपोई असलेल्या ठिकाणी पाणी पिऊन तृप्त होतो. मात्र जंगलाती प्राणी पशु पक्षी,कुत्रे,गुरे यांस पाण्यांसाठी खूप परिक्षम घ्यावे लागतात.मात्र पशु आपल्याला साठी खूप मोठे वरदान असून,त्यांच्या पिण्यांच्या सोय करावी या उद्दात विचारांतून वॉटर फॉर व्हॉइसलेस या संस्थेच्या माध्यमातून व अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि श्रीकृपा एक्वेरियमच्या माध्यमातून फ्री वॉटर बाऊल वितरण करण्यांचा कार्यक्रम हाती घेण्यांत आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डब्ल्यू .एफ. व्ही. अर्थात वॉटर फॉर व्हॉइसलेस या संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याकरता मोफत वॉटर बाऊल वितरीत केले जाते.तसेच ऑनलाइन रजिस्टर पद्धतीने प्राणी आणि पक्षी मित्र या वॉटर बाऊल मागणी करतात त्या अनुषंगाने डब्ल्यू. एफ. व्ही. ही संस्था संपूर्ण देशभर विविध ठिकाणी आपले उपक्रम राबवत असते. खोपोली शहरातील शास्त्रीनगर भागातल्या हेल्प फाउंडेशनच्या कार्यालयात खालापूर तालुका पशु वैद्यकीय अधिकारी विष्णू काळे, श्रीकृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे, हेल्प फाउंडेशनचे निलेश कुदळे आणि गोरक्षक हनीफ कर्जीकर यांच्या हस्ते बाऊलचे वितरण करण्यात आले.
खोपोली शहर, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा घाटात मोक्याच्या ठिकाणी हे बाऊल ठेवले जाणार असून त्यामध्ये पिण्याचे पाणी भरण्याची व्यवस्था देखील प्राणी आणि पक्षी मित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही करतील असा विश्वास पशु वैद्यकीय अधिकारी विष्णू काळे यांनी व्यक्त केला, या पर्यावरण पूरक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
-----------चौकट ---------
तालुका पशु वैद्यकीय अधिकारी - विष्णू काळे
0 Comments