टेंभरी येथिल जागृत शनिदेव ,३६ वर्ष पुर्वी झाली स्थापना,शनि आमावस्येला नवविवाहित जोडप्यांना मिळणार पुजेचा मान

 टेंभरी येथिल जागृत शनिदेव ,३६ वर्ष पुर्वी झाली स्थापना,शनि आमावस्येला नवविवाहित जोडप्यांना मिळणार पुजेचा मान 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक - टेंभरी : २४ मे, 

          चौक -  टेंभरी येथे गावात गेली ३६ वर्षे शनिदेवाची पुजा अर्चा सुरु असल्यांचे पहावयांस मिळत आहे.या ठिकाणी मुर्ती असून नित्य नेमाने या ठिकाणी  परिसरातील ग्रामस्थ दर्शन घेण्यांसाठी येत असतात. शनिदेवाचे पुजारी हरी ॐ बाबा ठोंबरे यांनी सांगितले की शनी आमावस्या च्या दिवशी या ठिकाणी होम केला जात असून नवविवाहीत असंख्य जोडप्यांना मान दिला जात असल्यांचे त्यांनी सांगितले.
             या शनिदेव स्थापना विषयी सांगताना म्हणाले की मी वयाच्या १८ वर्षापासून शनिदेवाची पुजा अर्चा करीत असून,किराणा दुकानापासून ते एका कारखान्यात काम करीत होतो.मात्र नोकरी गेली. मी शनिदेवाची पुजा करीत असतांना मला शनि आमावस्येला मुलगा झाला यामुळे त्यांचे सनी ठेवण्यांत आले,यावेळी ते म्हणाले शनि शिंगणापूर येथे नित्य नेमाणे जात असतो.यावेळी तेथे  १०८ ब्राम्हण यांनी मला उठविले आणी शनिचे महत्व लोकांपर्यंत पोहचविण्यांचे काम करण्यांस सांगितले.
                गेले अनेक वर्ष पायी दिंडी टेंभरी ते शनिशिंगणापूर चालत जात आसून या मध्ये शेकडो भक्त गण या दिंडीत सहभागी असतात.या ठिकाणी शनिदेवाची मुर्ती आमच्या घरातील कुटुंबाच्या हस्ते केली असून या आमावस्येला ५० ते ६० जोडपी या पुजेला बसणार असल्यांचे अध्यक्ष हरी ॐ बाबा ठोंबरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर