टेंभरी येथे शनिदेव जयंती साजरी,५६ नव वधुवराच्या हस्ते होम विधी संपन्न

 टेंभरी येथे शनिदेव जयंती साजरी,५६ नव वधुवराच्या हस्ते होम विधी संपन्न 






माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
टेंभरी : २७ मे,

            
           ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म, शिस्त आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते.म्हणून दर वर्षी टेंभरी येथे शनी जयंती साजरी केली जात असते.विशेष या ठिकाणी शनिदेवाची मुर्ती असून या त्यांचे मंदिर आहे.या तिथीच्या दिवशी होम हवन झाले. वैद्यिक शनी मंत्र च्या घोषात नुकताच विवाह बंधन झालेल्या नव विवाहातांना या पुजेचा मान मिळला.यावेळी ५६ जोडप्यांनी या ठिकाणी होम विधी करुन पुजा करण्यांत आली.

       या शनि जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम हाती घेण्यांत आले.काकडा आरती,होम विधी (गायत्री परिवार ) व अभिषेक,शनि महात्मे पठण व प्रवचन,स्थानाभिषेक व आरती,महाप्रसाद व पालखी सोहळा अदि कार्यक्रम  घेण्यांत आले.जेव्हा आपल्या कुंडलीत जेव्हा शनिची अशुभ स्थिती असते, तेव्हा त्याची साडेसाती आणि त्यांच्या प्रभावामुळे, व्यक्तीला आर्थिक अडचणी, मानसिक ताण, आरोग्य समस्या किंवा आयुष्यात  अडथळ्यांना तोंड द्यावे लागते मात्र त्यांच्या पुजेने सर्व दुर होत असल्यांचे मत भाविकांनी व्यक्त केले.

              सकाळ पासून  मान्सून पुर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शनि भक्तांची तारांबळ उडत असल्यांचे पहावयांस मिळाले.मात्र यांची तमा न बाळगता या पंचक्रोशीतील,तसेच तालुक्यातील असलेल्या भाविक भक्तांनी या ठिकाणी जावून दर्शन घेतले.दर वर्षी हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्त गण या दिवशी येत असतात.तसेच दर शनिवारी सुद्धा या ठिकाणी दर्शन घेण्यांसाठी भक्तांची रेलचेल असल्यांचे शनी पुजारी हरी ॐ बाबा यांनी बोलातांना सांगितले.
             
           

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर