महाविरण च्या दुर्लक्षामुळे वाकलेला पोल रस्त्यावर पडला, केलवली ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २६ मे,
महावितरणने मान्सूनपूर्व कामाला सुरुवात करत अनेक ठिकाणची विद्युत लाईन, पोल, ट्रांसफार्मर व इतर अनेक विद्युत उपकरणे बदलली असली,तरी अनेक ठिकाणी अवस्था जैसे थे असल्याचे पहावयास मिळत आहे.केळवली स्टेशन ते केळवली गाव मार्गावरील मुख्य रस्त्यावर पोल वाकलेला असता याची कल्पना ग्रामस्थांनी महावितरणला दिली असतानाही महावितरणने याकडे साफ दुर्लक्ष केले.परिणामी हा पोल रस्त्यावर पडले सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही यामुळे सर्वजण महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
यावर्षी मान्सून पुर्व आलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे अनेकांची मोठे नुकसान झाले आहे.याचा परिणाम महावितरण वर पडल्याचे पाहावयास मिळाले.गेल्या दोन तीन दिवसांपासून खालापूर तालुक्यात मान्सून पुर्व पावसाने थैमान घातल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले,त्याच बरोबर कामगार वर्ग यांची तारांबळ उडाली,याचाच परिणाम महावितरणच्या कामावर पडल्याचे पाहायला मिळाले.रस्त्यावर पडलेल्या या पोलामुळे नागरिकांच्या मध्ये सध्या भितीचे वातावरण पसरले आहे.
------------चौकट -------------
केळवली स्टेशन ते केळवली गाव या मुख्य रस्त्यावर मान्सून पुर्व आलेल्या पावसामुळे विजेचा वाकलेला होता, याबाबत महावितरण ला माहिती देवून दुरुस्ती करण्याची मागणी केली मात्र महावितरण ने केलेल्या दुर्लक्षपणामुळे हा वाकलेला रस्त्याच्या मध्ये पडला. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी सुद्धा नागरिकांच्या मध्ये भितीची वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थ केलवली - समाधान दत्तात्रय दिसले,
0 Comments