उत्सवामुळे मानवांचे भाग्य बदलते - ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
वारद : ४ मे,
आपण जेवढा मोठा उत्सव केला की, उत्सव आपणांस मोठे करीत असतो.हीच मोठी श्रीमंती असून गाडी,दागिणे,राजवाडा हे सर्व नश्वर असून उत्सव हे शाश्वत आहे.उत्सवाला आलेले वारकरी व त्यांच्या कुटुंबाचे भाग्यच बदलत असते.जिवनात देव आणी संत दिशा दाखवित असतात.यामुळे जिवनात उत्सव केले पाहिजेत ही भारतीय संस्कृती असून तिचे जतन करा यामुळे या उत्सवामुळे मानवी जिवनांचे भाग्य बदलत असते असे प्रबोधन रामदास भाई महाराज पाटील यांनी वारद येथे होत असलेल्या अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव सोहळा च्या काल्यांच्या किर्तनात बोलतांना व्यक्त केले.
काल दीपोत्सवाच्या वेळी या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक,वा रकरी आश्या विविध माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होते.या यज्ञोत्सवाचे आयोजन हनुमंत विष्णू लभडे ,ज्ञानेश्वर महाराज पाटील (खानाव )यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.हे चतुर्थ वर्ष असल्यामुळे या कार्यक्रमास यात्रे सारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झाले होते. मुखात विठ्ठलांचे नावाचा गजर,आणी टाळ्यांचा कडकडाट ने हा परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले.तसेच पसायदाने या कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली.
यावेळी भाई महाराज पुढे म्हणाले की संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या मात्र त्या पाण्यावरती तरंगल्या ,अभंग विचारांना प्रेरणा देत असतात.गोग्य दिशेने पाउल टाकले तर यश मिळते तर आयोग्य पद्धतीने टाकले तर अपयश मिळते.त्याच बरोबर जिवन तृप्त होण्यांसाठी संताच्या दिलेल्या मार्गावर चालावे,तसेच चुकीची संगत ही घातक ठरु शकते.माणुस हा दिशाहीन होत चालला आहे.सोळाव्या शतकातील काल सुवर्ण काळ मानला जात होता.कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रशासक होते तर संत तुकाराम महाराज प्रबोधन करीत होते.
ज्या गावामध्ये आध्यामिक सोहळा होतो.त्या गावाचा दर्जा वाढतो.सोयरे संबध जोडले जातात.कुटुंब सुखी होतात.येणारे संकट टळले जाते.असे उत्सवाचे महत्व आहे.आज पाण्यांचे संकट गडद होते चालले असून श्री कृष्णाने कालीया डोह शुद्ध करुन पाणी पिण्यायोग्य केले.तसेच पर्यावरण वाचविण्यांचा संदेश दिला.आणी गोवर्धन पुजण्यांस सांगितले आपल्या जवळ असलेली संपत्ती म्हणजे गायी वासरे,असे मत काल्यांच्या किर्तनात वारद येथे व्यक्त केले.
0 Comments