धामणी गुरांच्या गोठ्याला आग
१५ हजार पेंढा बैलगाडी व शेतीची अवजारे जळून खाक,
विद्युत लाईनच्या शॉट सर्किट मुले लागली आग.
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ३ मे,
सध्या उन्हाळ्याच्या झळा आणि आगी लागण्याच्या घटना दिवसागणिक घडत असून खालापूर तालुक्यातील धामणी येथे उमेश चिले या शेतक-यांनी गुरांसाठी पावसाळ्याचे नियोजन म्हणून जवळपास १५ हजाराच्या वर गुरांचे वैरण साठवणूक ठेवलेल्या वाड्याला विद्युत लाईनी च्या वर वाढलेले झाडे विद्युत महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने २ मे रोजी सायंकाळच्या दरम्यान छाटल्याने या जिवंत विद्युत लाईन मध्ये शॉट सर्किट झाल्याने शेड आग लागली.
या आगीत पेंडा, बैलगाडी,नांगर फली यासह शेतीचे सर्व अवजारे जळून खाक झाल्याने आता गुरांना रोजच्या खाण्या चे वैरण ही शिल्लक राहिले नसल्याने या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे.या आगीत जवळपास लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे चिले यांनी सांगितले.तर हे शेतकरी कुटुंब शासनाने व विद्युत मंडळाकडे नुकसान भरपाई साठी मागणी केलीं आहे.
खालापूर तालुक्यातील शेती यासह दुग्ध व्यवसाय निवडक राहिले आहेत.शेती व्यवसायला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत असून या कुटुंबाकडे १६ गुरे आहेत या गुरांसाठी पावसाळ्यात पावसाळ्यात उपयोग होईल या उद्देशाने काही शेती मधील व काही बाहेरून विकत घेऊन पेंड्यांच्या गुंड्या साठवून ठेवला होता. ७० हजार किमतीचा पेंढा,व बैलगाडी अंदाजे किंमत २५ हजार तसेच नांगर फळी यासह अन्य शेतीच्या मशागती साठी ठेवलेली शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे जळून खाक झाली आहेत.
त्यामुळे शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे त्यामुळे या घटने बाबत विद्युत मंडळाचे अधिकारी ,तलाठी यांना माहिती देऊन भरपाई ची अपेक्षा असल्याचे सांगितले आहे
--------------चौकट --------------
मागील वर्षी ही अशाच पद्धतीने विद्युत लाईनीमुळे आग लागून नुकसान झाले होते.आणि यावेळी ही विद्युत लाईन झाडे तोडल्याने जिवंत विद्युत वाहून नेणाऱ्या लाईनी झाडांच्या फांद्या तोडल्याने लोंबकळत आहेत त्यामुळे शॉट सर्किट होऊन ही आग लागली आहे आणि मोठे नुकसान झाले आहे या घटनेला विद्युत मंडळ जबाबदार असल्याने नुकसान भरपाई मिळावी ही विनंती
सामाजिक कार्यकर्ते धामणी - संतोष चिले
0 Comments