खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रांत संधी मिळते - अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे

 खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रांत संधी मिळते - अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे



माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : ७ मे,

                जिल्हा क्रीड़ाधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीने उन्हाळी क्रीड़ा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन अलिबाग येथील भव्य क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.  या शिबाराच्या उद्घाटनानिमित्त रायगडचे अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्य) महारुद्र नाळे, यांच्या  हस्ते झाले.  यावेळी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक  कार्यकर्ते रिकी अगरवाल हे देखील उपस्थित होते. 
               साधारण दीड महिना चालणाऱ्या या शिबिरात लगोरी सारख्या पारंपारिक खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजी सारख्या विविध खेळ प्रकारांचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे. साधारणता दीडशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग या शिबिरात असणार आहे. यानिमित्ताने रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी अशा शिबिरातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींमधून उद्याचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत याच उद्देशाने हे आयोजन असल्याचे आपल्या प्रस्ताविकात सांगितले. 
             महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या क्रीडा सुविधांचा फायदा तळागाळातल्या खेळाडूंना व्हावा आणि त्या माध्यमातून उद्या खेळाडूंना प्रत्येक क्षेत्रात चमकण्याची संधी मिळावी असा आशावाद व्यक्त करतांना बरेच वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या या क्रीडा संकुलाला नवीन झळाळी प्राप्त होईल असे मनोगत  व्यक्त करत अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. 
           शिक्षणा सोबत खेळाची जोडणी  अत्यंत असणे आजच्या स्पर्धेच्या युगात गरजेचे आहे असे सांगताना खेळांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंना गुण पत्रिकेत बोनस गुणांची जोड मिळत असल्याने अशा शिबिरांचे आयोजन ही विद्यार्थ्यांना मिळाली सुवर्णसंधी आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्य) महारुद्र नाळे यांनी केले. 
           हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक  कार्यकर्ते रिकी अगरवाल, पत्रकार धनजंय कवठेकर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर या शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक यतीराज पाटिल, तपस्वी गोंधळी, संदीप गुरव, देवीदास पाटिल, भरत गुरव, पुरुषोत्तम पिंगळे, संतोष जाधव, नागेश शिंदे, वीरेंद्र पवार, माधवी पवार, आदि लाड़, तुशांत मढवी, सिद्धार्थ पाटिल, प्रियंका गुंजाळ, दिव्या मोकल यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. प्रशिक्षक यतीराज पाटिल यांनी आभार प्रदर्शन तर जगदीश मरागजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नेमबाजी, कराटे, लाठी काठी, लगोरी सारख्या विविध खेळांची प्रात्यक्षिके झाली तर मान्यवरांनी बॅडमिंटन खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर