खरीप हंगामातील उत्पन्न वाढविणांसाठी शेतकरी वर्गांची रामेती येथे कार्यशाळ
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ७ मे,
खरीप हंगाम सुरू होत असल्यामुळे वेळेत नियोजन करून कृषी विभागातील खालापूर तालुक्यातील विविध योजनेची माहिती देऊन, लाभ घेण्याकरिता तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापक प्रशिक्षण संस्था रामेती खोपोली येथे घेण्यांत आले.
यावेळी शास्त्रज्ञ डॉक्टर मर्दाने यांनी शेतकऱ्यांस विविध भात बियाणांची माहिती देण्यांत आली.भाताच्या लागवडीच्या विविध पद्धतीनं विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,झुम मिटिंग द्वारे पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ सरांनी गटशेती व डिजिटल शेती शाळा या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,कृषी पर्यवेक्षक गोसावी यांनी पी.एम.किसान व ॲग्री स्टॅक विषयी माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक खालापूर उघडा यांनी भात लागवडीचे विविध पद्धती, नरेगा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी अधि.कीर्ती लडकत, मंडळ कृ.अधि.मुलानी, सुखकर्ता ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे चेअरमन सुभाष मुंढे, स्मरण कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे चेअरमन राजेंद्र पाटील व सदस्य महेश पाटील, भूमीस्पंदन खालापूर नैसर्गिक शेती फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड चे चेअरमन राजीव खांडेकर, वरद विनायक शेतकरी संघटनेचे सदस्य मंगेश धामणसे व तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी भात फिक स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेले कांढरोली तर्फे वनकर येथील अरविंद दळवी यांना रोप देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत स्थापित गटातील शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा बीटीएम प्रज्ञा पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी कीर्ती लडकत यांनी केले.या कार्यशाळेत कृषी अधिकारी नितिन माहाडीक ,आंधळे सर, कदम सर, सारंग, शेटे, कृषी सेवक, सुमित भगत,भरगंडे,देवकर, मुंढे,भोंगळे अदि उपस्थित होते.
0 Comments