व्यवस्थापक सक्षम निर्णय घेत नसल्याने कामगारांचे आंदोलन सुरुच,कामगारांची तब्येत खालावली,गेट समोर बसून महिला वर्गांचा निषेध व्यक्त
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
पौध : १९ जून, खालापूर तालूक्यातील पौध गावानजीक असलेला थरमॅक्स या कारखान्यातील कामगारांना कोणतीही नोटीस न देता कामावरुन १६ कामगारांना घरचा रस्ता दाखविल्यामुळे आमरण उपोषणांचे हत्यार उपसवून गेले चार दिवस कामगार चोविस तास तंबू ठोकून आपला निषेध व्यक्त करीत आहे.त्यातच चार कामगारांची प्रकृती खालावली असल्यामुळे महिला वर्गांनी आपला संताप व्यक्त करुन गेट जवळ धरणे आंदोलन सुरु केल्यांचे पहावयास मिळाले यामुळे या ठिकाणी यात्रेसारखे प्रचंड स्वरुप पहावयांस मिळत होते.
मात्र व्यवस्थापक योग्य तो निर्णय घेत नसल्याने हा तीडा दिवसेन दिवस आधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. कामगारांना भूल थाप आणी आश्वसानांची खैरात या पली कडे आपल्या काही मिळत नाही. मात्र व्यवस्थापक जणू मौन पाळून बघ्याची भूमिका सकारत आहे.असे चित्र पहावयास मिळत आहे.जो पर्यंत कामगारच्या मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही आमचे आंदोलन असेच चालू राहील असे महिला वर्ग कामगार यांनी आपला निषेध व्यक्त करीत म्हणाले.
व्यवस्थापक यांनी कामगारांना कामावर घेतल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.गेले काही दिवस वातावरणामध्ये गारवा निर्माण होत असल्याने येथील कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.मात्र व्यवस्थापक यांना काही सोयर सुतक नाही.मे महिन्यात असे आंदोलन केले.मात्र त्यांस कामगारांस केराची टोपली दाखविली यामुळे संतप्त कामगारांनी पुन्हा एकदा व्यवस्थापक यांना वठणीवर आण्यासाठी आमरण उपोषणांचे हत्यार उपसले आहे.कामगारांना न्याय देण्यांसाठी सुधाकर भाऊ घारे,अंकित साखरे,उत्तम शेठ भोईर असे अनेक नेते मंडळी गेट समोर उभे असल्यांचे पहावयांस मिळत होते.
0 Comments