लढा यशस्वी,१६ कामगारांना एक महिन्यात पुन्हा सेवेत रुजू करणार,आंदोलन तुर्तास स्थगिती
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
पौध : २० जानेवारी,
थरमॅक्स या कारखान्यात माथाडी कामगार म्हणून काम करीत असलेल्या कामगारांना कोणतीही पुर्व सुचना न देता कामावरुन काढुन टाकल्यामुळे,संतप्त कामगारांनी आपला मोर्चा आमरण उपोषण करण्याकडे वळविले होते.गेले चार दिवस हे अंदोलन सुरु असतांना चार कामगारांची प्रकृती खालावली जात होती.मात्र सायंकाळी पर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यांचे हा तीडा अधिक गुंतागुंतीचा होत चालला होता.जिल्हा परिषदेचे नेते सुधाकर घारे यांनी गेटसमोर बसून कामगारांच्या आंदोलनांस पाठींबा दिला अखेर व्यवस्थापक यांनी झुकते माप घेत कामगारांस एक महिन्यात कामावर घेण्यांस सहमती दर्शवली असल्यामुळे हे आंदोलन तुर्तास स्थगिती करण्यांत आले आहे.असल्यांचे कामगारांनी सांगितले.
व्यवस्थापक कोणतीही भुमिका घेत नसल्यामुळे,या ठिकाणी या परिसरातील,नागरिक,कामगार कुटुंब त्याच बरोबर पोलीस कर्मचारी या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपस्थित होते.त्याच बरोबर कामगार आणी त्यांचे कुटुंब गेट समोर बसून आपला निषेध व्यक्त करीत होते.अडीच महिने हाताला काम नसल्यामुळे ते घरीच असल्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली असतांना हे सांगताना महिला वर्गांचे अश्रू अनावर होत असल्यांचे पहावयांस मिळाले.
अखेर रात्री व्यवस्थापक यांनी झुकते माप घेत माथाडी कामगार आणी कामगार नेते संतोष बैलमारे,सुरेश पाटील,नरेश पाटील,अंकित साखरे अदि च्या उपस्थित मिटिंग मध्ये आम्ही सर्व कामगारांस कामावर पुन्हा घेवू असे आश्वासन देण्यांत आले.सदर उपोषण कर्त्यास जिल्हा परिषदेचे नेते सुधाकर घारे आणी व्यवस्थापक यांनी ज्यूस देत आंदोलन थांबविण्यांस सांगितले.यावेळी मा.सरपंच गोपीनाथ जाधव,उत्तम शेठ भोईर,कुमार दिसले,प्रशांत खांडेकर ,राजेश पारठे,मधुकर घारे ,मच्छिद्र पाटील,किशोर पाटील,सचिन कर्णूक,सतीश घोडविंदे, माजगांव सरपंच दिपाली - पाटील,नडोदे सरपंच -निकिता भालेकर व सदस्य,मा. सरपंच संतोष महाब्दि,श्रूती ताई म्हात्रे,नंदाताई म्हात्रे,संतोष ठाकूर,उमेश लानगे,श्याम भाई साळवी,निगडोली पोलीस पाटील -सुरेश ठोंबरे,गौरख रसाळ,मा.उप सभापती विश्वनाथ पाटील,महेश पाटील ( लाडीवली )उबाठा शिवसेना एकनाथ पिंगळे,
उपस्थित होते. तसेच चार कामगार दिनेश ठोंबरे,रमेश फराट,दिपक फराट,निलेश शिंदे यांस यांस ग्रामीण रुग्णालय चौक येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्यांचे डॉ.सविता काळेल यांनी सांगितले.
0 Comments