अन्न व औषध प्रशासनाची खालापूरात धडक कारवाई करत गुटखा जप्त
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २६ जून ,
साजगाव येथील महड कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या फॉर्म हाउस वर छापा टाकत धडक कारवाई करण्यांत आली.६५ हजारांचा विमल कंपनीचा गुटखा या ठिकाणी सापडला.सोबत आरोपी यांचे दोन मोबाईल व दोन चाकी स्कुटी ताब्यात घेण्यांत आली असून पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग व खोपोली पोलिस स्टेशन करत आहेत.
रिपब्लिकन सेना व खोपोली पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभाग पेण यांनी खोपोली हद्दीमध्ये महड येथे रस्त्यालगत असणाऱ्या फॉर्म हाउस असून मालक हे खारघर येथे राहत असून त्यांनी देखरेखी साठी ठेवलेल्या चौकीदार व त्याचे अन्य साथीदार यांना याचा सुगावा लागताच ते त्या ठिकाणावरून पळून गेले.
यावेळी खोपोली पोलिस व अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी सरकारी पंच व फॉर्म हाउस मालक यांना सोबत घेऊन रूम मधील झडती घेतली असता जवळपास,६५ हजारांचा विमल गुटखा सापडल्या अन्न व औषध प्रशासना अधिकारी विक्रम निकम व प्रशिनार्थी अधिकारी सोबत होते तसेच खोपोली पोलिस अधिकारी अभिजीत होरांबळे, प्रशांत पाटील , समीर पवार, चव्हाण, रामा मासाळ, आकाश डोंगरे, किरण देवकते, अमोल कुंभार, राहुल चौगुले अदिच्या उपस्थित ही कारवाई करण्यांत आली. L
0 Comments