राष्ट्रीय एकजुट कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी रामचंद्र (रामभाऊ) पवार यांची निवड

 राष्ट्रीय एकजुट कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी रामचंद्र (रामभाऊ) पवार यांची निवड 





माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ३० जून,

                भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय एकजुट कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी रामचंद्र (रामभाऊ ) पवार यांची नुकतीच संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बलबीर नेगी यांनी नियुक्ती केली.
            संपूर्ण देशात भारतीय जनता प्रणित राष्ट्रीय एकजुट कामगार संघटना कार्यरत आहे.आमदार सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली संघटनेचे काम अविरत पणे सुरु आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदर संघटना सदैव तत्पर आहे.
            माजी मंत्री  रविंद्र चव्हाण व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे विश्वासू सहकारी तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात कामगारां साठी झटणारे, कामगारांना न्याय देण्यासाठी धडपड करणारे, माथाडी संघटनेच्या माध्यमातून विविध कंपन्यामध्ये कामगारांसाठी लढा उभारणारे कामगार नेते म्हणून रामचंद्र (रामभाऊ) पवार यांचे नाव अग्रेसर आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय एकजुट कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बलबीर नेगी यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी रामचंद्र पवार यांची निवड केली. त्यांची निवड होताच खोपोली शहरातील कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून जल्लोष  साजरा केला.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर