सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांच्या सौजन्याने शालेय उपयोगी साहित्य वाटप,
दहागाव खरीवली करंबेली शाळेतील संरक्षण भिंतीचे लोकार्पण सोहळा संपन्न
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १ जुलै,
सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांच्या सौजन्याने गेली अनेक वर्षे दहागाव खरीवली करंबेली प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात करण्यात येते. भारतीय जनता पार्टी खालापूर यांचे माध्यमातून जिल्हा नियोजन मधून चार लाख रुपये निधि उपलब्ध करून करंबेली खरविली प्राथमिक शाळेमध्ये संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले त्याचे आज लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी करंबेली खरविली प्राथमिक शाळेमध्ये भरत महाडिक यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव, खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, कर्जत खालापूर विधानसभा युवा संयोजक प्रसाद पाटील, निकिता हेलांडे,विकास रसाळ, हरिभाऊ जाधव, रविंद्र मोरे, राजू महाडिक बूथ अध्यक्ष, राजू पाटील, प्रभाकर पाटील, विष्णू पाटील, काशिनाथ पाटील, रघुनाथ मोहिते,
नारायण मोहिते, रामदास पालांडे, शेखर महाडिक, विलास महाडिक, हनुमंत महाडिक, बाळाराम महाडिक, भोलेनाथ महाडिक, प्रफुल महाडिक, गीतेश महाडिक, सतीश महाडिक, अजित गायकर, हनुमंत महाडिक, उत्तम महाडिक, संकेत महाडिक, सीताराम महाडिक, अशोक गायकर, सादुराम महाडिक, संतोष पाटील, विष्णु पाटील, परशुराम पाटील, अशोक पाटील पांडुरम हेलांडे, संजय हेलांडे, मुख्याध्यापिका सुप्रिया नवले, संजय रिंगे शिक्षक, कल्याणी पाठक, रविंद्र घोगरे शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.


0 Comments