चौक विद्युत कार्यालयात भिंगारीचे मुख्य वरिष्ठ अभियंताची भेट,ग्रामस्थांनी वाचला समस्याचा पाढा
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : २० जुलै,
चौक परिसर दिवसेंदिवस गजबजलेले होत चालले असले तरी सुद्धा विजेच्या समस्यांच्या बाबतीत पुढे असल्यांचे समजते.या परिसरात या समस्या वाढत असतांना नुकताच भिंगारी येथिल मुख्य वरिष्ठ अभियंताची शिंदे यांच्या समोर आपल्या समस्यांना पाढा वाचण्यांस आला.यावेळी येथिल ग्रामस्थ व्यापारी संघटना आक्रमक झाल्यांचे पहावयास मिळाले.१५ दिवसात ह्या तुमच्या समस्या मार्गी लावण्यांचे आश्वासन देण्यांत आले.
चौक परिसरात हा बाजरपेठ असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने ग्राहकांची रेलचेल सुरु असून,मात्र सातत्याने विज पुरवढा खंडीत होणे कधी चालू विद्युत वाहिनी पडणे यामुळे येथिल व्यापारी,स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे.मात्र या सर्व समस्या लवकरात - लवकर मार्गी लावण्यात येइल असे अश्वासन एमईसीबीचे पदाधिकारी उपस्थितांना देण्यांत आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष गणेश कदम,चौक ग्रामपंचायतचे उपसरपंच जगदीश हातमोडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सोनटक्के,सुभाष पवार ,निखिल मालुसरे,मनोज गुरव सामाजिक कार्यकर्ते विजय ठोसर, यशवंत जोशी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चौक हर्षल हनुमंते व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments