कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंती निमित्ताने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न
माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली २१ जुलै,
कुस्ती हाच श्वास आणि कुस्ती हाच ध्यास समजून ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुस्तीया खेळासाठी दिले. ज्यानी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सव्वीस वर्ष खजिनदार आणि दोन वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले असे कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोली येथील राजाराम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने दरवर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या स्पर्धेचे आयोजन खोपोलीतील महाराजा हॉलमध्ये केले गेले. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातून २०० हुन अधिक कुस्तीगीरांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. ही स्पर्धा १४ आणि १७ वर्षाखालील मुले व मुली तसेच वरिष्ठ गट पुरुष व महिला अशा सहा गटांमध्ये खेळविण्यात आली. विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
आरोग्य,संस्कार आणि शिस्त या त्रिसूत्रीवर आधारित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या यशाबद्दल मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संकुलतील कुस्तीगीरांनी गेल्या चार वर्षांमध्ये ५० हून अधिक मुंबई विभागीय, राज्य, राष्ट्रीय पदके व महाराष्ट्र केसरी पदक त्याच सोबत फॉरेन एक्स्पोजर टूर प्राप्त केल्याबद्दल कौतुक केले. क्रीडा शिक्षक पदावर नियुक्त झालेल्या आणि महाराष्ट्र पोलिस दलात भरती झालेल्यांचे अभिनंदन केले. संकुलाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कुंभार, सचिव जगदीश मरागजे यांचे विशेष कौतुक करत भविष्यात संकुलासाठी कोणत्याही स्वरूपाची मदत करणार असल्याचे अभिवचन देत सर्वांना शुभेच्छा दिल्या,
या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे, खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, युवा उद्योजक विक्रम साबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, ॲड जयेश तावडे, गजानन हातमोडे, पिरंगुट पुणे येथून आलेले बाळासाहेब गोळे, चांगदेव पवळे, रमेश पवळे, मोहन निकटे, संतोष दगडे, प्रकाश पवळे, महादेव अण्णा गोळे, हनुमंत कुंभार,शिल्पा मोदी, भावेश रावल, तानाजी चव्हाण, दत्तात्रय पालांडे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, महेंद्र सावंत, सह्याद्री विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत खाडे, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरे सर, जे सी एम एम स्कूल खोपोली मुख्याध्यापिका मधुगंधा तुरे आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या स्पर्धेचा आनंद अनेक कुस्ती शौकिनांनी घेतला. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या क्षितिजा मरागजे आणि सोहेल शेख यांच्या कुस्त्या स्पर्धेचे आकर्षण ठरल्या.
0 Comments