विक्रम गायकवाड यांची खालापूर तालुका पुरोगामी युवक संघटना तालुका उपाध्यक्ष पदि निवड
माय मराठी न्युज : वृत्तसेवा चौक : १७ जुलै,
चौक वावंढळ गावात वास्तव्ये करीत असलेले तरुण तडफदार युवक म्हणून विक्रम राजेंद्र गायकवाड यांच्याकडे पाहिले जाते.राजकारण समाजकारण यांची सांगड घालून जनसेवा करण्यांसाठी सातत्याने अग्रेसर असून विशेष म्हणजे त्यांचे आजोबा सुद्धा शेकापक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात होते.यामुळे नुकताच त्यांना खालापूर तालुका पुरोगामी युवक संघटना तालुका उपाध्यक्ष निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी त्यास पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. विक्रम गायकवाड हे व्यवसायिक असून राजकारणांची त्यांस आवड आहे ऐंशी टक्के समाजकारण आणी वीस टक्के राजकारण हे तत्त्व मनाशी बाळगून ते राजकारणात सक्रिय आहेत.मात्र कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता,शेकाप चा झेंडा हाती घेवून आपण एकनिष्ठ असल्यांचे त्यांनी या माध्यमातून सांगितले विविध समाजकारण करुन आपल्या कामाचा ठसा उमठविला असतांना त्याच बरोबर त्यांच्या मध्ये असलेली कामाची तळमळ पाहता नुकताच त्यांस हे पद देवून नियुक्ती करण्यांत आली. खालापूर तालुका नगराध्यक्ष संतोष भाई जंगम शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस - किशोर भाई पाटील खालापूर तालुका व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चौक विभाग खालापूर तालुका विभाग प्रमुख यांच्या उपस्थित त्यांच्यावर खालापूर तालुका पुरोगामी युवक संघटना तालुका उपाध्यक्ष ही जबाबदारी देण्यांत आली.गायकवाड हे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्ते रायगड जिल्हा विभागीय उपाध्यक्ष असून त्यांच्या या कामाची चळवळ विलक्षणीय असून त्यांना देण्यांत आलेले हे पद निश्चितच पक्ष वाढविण्यांसाठी उपयोगी ठरेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

0 Comments