नालंदा ऑर्गनायजेशन,संस्थेकडून मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांस ग्रामसमृद्धी पुरस्कार जाहिर
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगाव / आंबिवली १७ जुलै
ग्रुप ग्रामपंचायत माजगाव मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी त्यांच्या कारकिर्दित सरपंच असतांना विविध विकास कामे करुन आपल्या कामाचा ठसा उमठविला होता.त्यांच्या या कामाची दखल घेत नवराष्ट्र वृत्तपत्र यांनी आदर्श सरपंच पुरस्कार मार्च २०२२ मध्ये देवून सन्मानित करण्यांत आले होते.मात्र ते आता सरपंच पदावर नाही मात्र त्यांनी केलेल्या विकास कामाची दखल नालंदा ऑर्गनायजेशन,संस्थेकडून घेत त्यांस ग्रामसमृद्धी पुरस्कार हा कला विद्याशिक्षण क्रांतीचा केंद्र्बिंदू असलेला एस.एम.जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे १९ जुलै रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यांत येणार आहे.
मा.सरपंच यांनी अनेक वर्ष सरपंच पद भुषविले असतांना सन २०१८ ते २२ कारकिर्दित विविध विकास कामे करुन ही ग्रुप ग्रामपंचायत नावारुपाला आनली,ते सरपंच पदावर असतांना ४.५ कोटी चा निधी आणून विकास कामे केली.त्याच बरोबर आमदार फंडातून सुद्धा विकास कामे केली.रस्ते अंधारमय न राहता उजेडात यावे यासाठी सौर उर्जा पथ दिवे लावण्यांत आले.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,विहीरीचे काम,पाण्यांचे फिल्टर,प्रत्येक गावाला जल जिवन मिशन योजना अंतर्गत घरोघरी नल योजना,अदिवासी यांना पिण्यांचे पाणी,गावातील प्लेवर ब्लॉक क्रॉक्रेटिकरण,तसेच कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी मध्ये त्यांचे महत्व पुर्ण योगदान आहे.
त्यांना ग्रामसमृद्धी पुरस्कार जाहिर होताच अनेकांनी त्यांस शुभेच्छा दिल्या,विकास कामे केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यांत येत असल्यामुळे या संस्थेनी उत्तम व्यक्ती निवड केल्यांचे बोलले जात आहे.

0 Comments