धनगर समाजाचे डॅशिंग आणि दानशूर व्यक्तिमत्व - आनंदराव कचरे
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे,
खोपोली : ९ जुलै ,
धनगर समाजाचे डॅशिंग आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेले,नेहमी गोर गरिबांसाठी अहोरात्र मेहनत घेत असलेले आनंदराव कचरे यांचा आज ५० व्या अभिष्ठचिंतनांच्या निमित्ताने शुभेच्छा
आनंदराव कचरे यांचा जन्म ११ जुलै १९७५ श्री क्षेत्र बेलवडे हवेली ता.कराड जि.सातारा या गावी झाला,आनंदराव कचरे हे वयाच्या सहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती, आई आणि लहान भावाची जबाबदारी आनंदराव कचरे यांच्यावर आल्याने त्यांनी त्याही परिस्थितीत शिकत कुटूंबाची जबाबदारी पार पाडली, आणि काही वर्षानंतर ते मुबंईला कामासाठी आले,ते काम करत असताना
त्यांनी ऑल इंडिया धनगर समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष पद घेऊन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावर जाऊन गोर गरीब मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले, तर त्यांनी अनेक गोर गरीब समाज बांधवाना मदत केली आहे, एखाद्या समाज बांधवावर अन्याय होत असेल तर ते प्रत्यक्षात जाऊन त्यांना सर्वोतपरी मदत करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ते आजही आपल्या कुटूंबाची जबाबदारी सांभाळीत आहे.अनेक गोर गरीबाना मदत करीत आहेत, त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक संस्थानी समाज भूषण पुरस्कार दिले आहेत, ते आता ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे रायगड जिल्हा प्रभारी म्हणून काम करत असून त्यांचे समाज सेवेचे काम चालूच आहे.
0 Comments