चौक ग्रुप ग्राम पंचायत च्या उपसरपंच पदी पूजा जगदीश हातमोडे यांची बिनविरोध निवड
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ९ जुलै,
ग्रुप ग्राम पंचायत चौक च्या उपसरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या पूजा जगदीश हातमोडे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उपसरपंच सुभाष पवार यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच रितू ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.१७ सदस्य असलेली ग्राम पंचायत मध्ये सौ.पूजा जगदीश हातमोडे यांचा एकमेव उप सरपंच पदाचा अर्ज दाखल झाला. दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच रितू ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली असता, एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करून त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडणूकीत ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे यांनी कामकाज पाहिले.पूजा हातमोडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर झाल्यावर फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, ग्राम पंचायत प्रमुख जगदीश हातमोडे, सरपंच सुहास कदम,
जेष्ठ नेते सुनील गायकवाड, मा. उप सरपंच सचिन मते, नंदू हातमोडे, रामदास काईनकर, पिंट्या राणे , सचिन साखरे उपसरपंच तुपगाव, प्रकाश जाधव यांच्या सह सदस्य ॲड.रीना सोनटक्के, नयना झिंगे, स्वाती देशमुख, दबके, लक्ष्मी वाघ, निखिल मालुसरे,सुभाष पवार, राजन गावडे, कल्पना शिंगवा, स्वाती देशमुख, सुवर्णा राणे, प्राची दबके, महादेव पिरकड, अश्विनी म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments