समाजसेवक संतोष शिंगाडे यांचा गौरव म्हणजे समाजकार्याला नवे बळ : राष्ट्रीय समाज महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांचे प्रतिपादन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
रसायनी २१ ऑगस्ट
समाजाच्या जडणघडणीत निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान होणे म्हणजे संपूर्ण समाजकार्याला प्रेरणादायी ठरणे होय. पनवेल तालुक्यातील आपटा-सारसई येथील समाजसेवक संतोष राम शिंगाडे यांना मिळालेला “राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार” हा केवळ त्यांचा व्यक्तिगत गौरव नसून, समाजसेवेच्या क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रयत्नांना मिळालेली दखल असून त्यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे समाजसेवक संतोष शिंगाडे यांचा गौरव म्हणजे समाजकार्याला नवे बळ असे गौरउदगार राष्ट्रीय समाज महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी व्यक्त केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, शोषित व दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी योगदान दिले. त्याच परंपरेत समाजकार्याची वाटचाल करताना संतोष शिंगाडे यांनी आदिवासी, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने काम करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळणे हे अत्यंत योग्य ठरले आहे. माजी आमदार अशोक धात्रक यांच्या हस्ते झालेला हा गौरव सोहळा, समाजसेवकांना नवे ऊर्जास्थान देणारा ठरला. आजच्या भोगवादी व स्वार्थी प्रवृत्तीच्या काळात समाजहितासाठी कार्य करणे ही सोपी गोष्ट नाही. पण तरीही शिंगाडे यांनी विविध चळवळींतून सामान्य माणसांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.


0 Comments