धामणसई ग्रामस्थांनी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट,
रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लावू- खासदार सुनील तटकरे यांनी दिले आश्वासन
विविध समस्येच्या विळख्यात इंदरदेव धनगरवाडा
खोपोली- दत्तात्रय शेडगे
१५ ऑक्टोबर
रोहा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात डोंगरावर इंदरदेव धनगरवाडा असून तेथील 48 घरांना गेल्या वर्षी वनवा लागल्याने यातील संपूर्ण 48 घरे जळून खाक झाली होती, तर येथे रस्ता, लाईट, पाणी अश्या मूलभूत सुविधा नाहीत.यामुळे धामणसई ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांची नुकताच भेट घेतली असून विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यांत आली.
इंदरदेव धनगरवाड्याच्या रस्त्याचा लवकरच प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी युवा नेते मंगेश कोकळे, अनंता देशमूख, अनंता कोकळे, भगवान कोकळे, भाऊ कोकळे, ज्ञानेश्वर कोकळे, विलास कोकळे, किसन शिद, निलेश जंगम, दत्ता शिद, रमेश शिद, गोविंद शिद,आदी उपस्थित होते

0 Comments