निष्ठावंत उबाठा शिवसैनिक रघुनाथ बामणे यांचे स्वप्न पूर्ण,

 निष्ठावंत उबाठा शिवसैनिक रघुनाथ बामणे यांचे स्वप्न पूर्ण,

 ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी उपसरपंच पदी निताली बामणे यांची बिनविरोध निवड 

माय मराठी न्यूज : वृत्तसेवा 
सारंग १८ फेब्रुवारी,



         ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी उपसरपंच पदावर निताली बामणे ह्यांची खेळी मेळीच्या वातावरणामध्ये एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे खालापुर तालुक्यातील सारंग गावातील निष्ठावंत उबाठा शिवसैनिक म्हणून ओळख असलेले रघुनाथ बामणे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे बोलले जाते.या अगोदर उप सरपंच पदाचा कार्यभाग अपर्णा पवार हे सांभाळीत होते.मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होतच उप सरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला.

       रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली.ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी सरपंच रमेश गायकवाड, उप सरपंच अपर्णा पवार , ग्रामसेवक गोकुळदास राठोड सदस्या -प्रतिभा भोईर,दर्शना फाटे,अंजना भोईर,आशा कातकरी,स्वपना ठोंबरे, सदस्य - रोशन गायकवाड,जनार्दन मुकणे,निलेश ठोंबरे,यांच्या सर्वांच्या मते उपसरपंच पदासाठी निताली बामणे ह्यांचे नाव सुचविले,यावेळी सर्वांनी त्यांची एकमताने निवड करण्यात आली.
             

  निताली बामणे  उपसरपंच पदि बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर होताच, बाहेर जमलेल्या  कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजी करत एकच जल्लोष करण्यांत आला.आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.लहानपणापासूनच समाजसेवेचे आवड असलेल्या निताली बामणे यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयाला जनतेनेही उत्तम प्रतिसाद दिला.आणी ग्राम पंचायत सदस्या म्हणून निवडून आले आज त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन होते आहे.यावेळी विनोद भोईर,उत्तम शेठ भोईर, सुनिल थोरवे,विजय पाटील, अशोक मेहतर,दिलीप पाटील तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

निष्ठावंत उबाठा शिवसैनिक रघुनाथ बामणे यांचे स्वप्न पूर्ण,