प्राथमिक आरोग्य केंद्र लोहप येथे स्तनपान समुपदेशन,

 प्राथमिक आरोग्य केंद्र लोहप येथे स्तनपान समुपदेशन,

 गरोदर महिला, आशासेविका यांचा सहभाग,

जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग च्या अधिसेविका गायत्री म्हात्रे, यांचे मोलाचे मार्गदर्शन

माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
लोहप : 12 डिसेंबर,


         प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सातत्याने विविध उपक्रम असताना एक पाउल पुढ टाकत महिला वर्गाची शारीरिक सुरक्षा महत्वाची त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या उदात विचारातून तज्ञ-परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय, रायगड अलिबाग येथे यांच्या माध्यमातून ए.एन.एम प्रथम वर्ष विद्यार्थी परिचारिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे स्तनपान समुपदेशन सादर केले. 
          हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्याकरिता जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग च्या अधिसेविका गायत्री म्हात्रे, परिचर्या, अधिकारी परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय अलिबाग सारिका पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य-अधिकारी डॉ. मंगेश देशमुख, बालरोग तज्ञ डॉ मंगेस कौशल मुंबईकर तसेच स्त्रीरोगू तत-डॉ. ईशा विठलानी उपस्थित होते.
       तसेच परिचर्या पाठ्यनिर्देशिका धनश्री पाटील व  वैभवी थळे, आरोग्य सहायिका मीना खरात, आरोग्य सेविका- धनश्री शेळके, औषधनिर्मात्या-सोनाली गाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ समीक्षक पाखरे आदि च्या उपस्थितीत ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी परिसरातील ग्रामस्थ, गरोदर महिला, आशासेविका तसेच रुग्णांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज