तालुका कृषी अधिकारी सुनिल निंबाळकर यांनी केली फळबागा आंब्याची पाहणी,
रोगापासून सर्वक्षण होण्यासाठी मार्गदर्शन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
तालुक्यातील शेतकरी भात लागवड समवेत आंबे तसेच विविध फळाचे उत्पन्न घेत असतो.कोकणातील शेतकरी आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतात.सध्या हिवाळा ऋतू सुरू असतांना हापूस आंब्यांना मोहर येण्यास प्रारंभ झाला असला तरी सुद्धा, बदलत्या वातावरणामुळे मोहरावर विपरीत परिणाम होवून मोहर गळती होत असते. मात्र ते रोखले जावे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी खालापूर तालुक्यातील खानाव व खांबेवाडी येथे तालुका कृषी अधिकारी सुनिल निंबाळकर यांनी नुकताच शेतकरी मंगेश धामणसे यांच्या आंब्याची पाहणी करून शेतकरी वर्गास मार्गदर्शन केले.
सध्या थंडी मोठ्या प्रमाणात मोहर सुद्धा उत्तम आले असून काही ठिकाणी वाटाणे एवढे आंबे लगडले असल्याचे पहावयास मिळत आहे.मात्र हापूस तसेच अन्य आंब्यास फळ धारणा सुरू असून दर वर्षी खूप येत असलेला मोहर बदलत्या वातावरणामुळे गळती होत असते यामुळे आंबा मोहोर संरक्षणासाठी जैविक नियंत्रण (निंबोळी अर्क) रासायनिक फवारणी, योग्य छाटणी, सूर्यप्रकाश व पाण्याचे व्यवस्थापन, आणि तुरतुडे व भुरीसारख्या रोगापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब आंधळे व कृषी सहाय्यक अधिकारी सूर्यकांत मुंढे, तसेच खानाव येथिल शेतकरी मंगेश धामणसे यावेळी या परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.आंबा पिकासाठी केलेले मार्गदर्शन शेतकरी वर्गास लाभ दायक ठरणार असून या पासून अधिक उत्पन्न मिळणार असल्याची भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.


0 Comments