घरोघरी मिळत आहे विजय भाव! चा आशीर्वाद,
शेकापने उमेदवारी अर्ज मागे घेत जयवंत पाटील, चंदकांत पाटील यांचा परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा
उत्तम शेठ भोईर प्रचारात अग्रेसर,घड्याळ,मशालीला मतदान करण्याचे भावनिक आवाहन
माय मराठी न्यूज : वृत्तसेवा,
चौक : ,27 जानेवारी,
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सावरोली जिल्हा परिषद निवडणुकी लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात होते.मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे जयवंत संभाजी पाटील,तसेच डमी उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत चौक ब्राह्मण आणि येथे प्रचार रॅलीमध्ये परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला असल्याचे या प्रचारार्थ स्पष्ट केले. सावरोली जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्ष सक्रिय असून या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे याचा लाभ निश्चितच परिवर्तन विकास आघाडीला होणार असल्याचे जयवंत पाटील यांनी प्रचार रॅलीत बोलताना आपले मत व्यक्त केले.
त्याच बरोबर मराठा समाजाचे नेते उत्तम शेठ भोईर यांनी सकारात्मक विचार करत दोन पावले मागे घेत निवडणुकीतून माघार घेत आपल्या मित्र पक्षाला पाठिंबा दर्शविला तसेच कोणत्याही प्रकारची मनात भावना न ठेवता या प्रचार रॅलीत सक्रिय झाल्यामुळे. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली. या निवडणुकीत स्वतःचा स्वार्थ न पाहता आपल्या समाजाचा नेता या निवडणुकीमध्ये बहुसंख्येने निवडून येईल यासाठी सातत्याने मतदार राजा पर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहे.आज प्रचाराचा पाचवा दिवस असतानाही आपल्याला दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे पहावयास मिळाले.
सावरोली जिल्हा परिषद, उमेदवार संतोष बैलमारे,पंचायत समिती वाशिवली पुनम म्हात्रे,व सावरोली,प्रमिला पाटील ह्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना आज , वानिवली,कोपरी, कोपरी वाडी,ब्राम्हण आली, तुपगाव मोहल्ला, तुपगाव,चौक पाली,या गावातील प्रत्येकांच्या घरी जावून घड्याळ, मशाल या चिन्हावर बटण दाबुन भरघोष मतांनी निवडून देण्याची तुमची असे भावनिक आवाहन उत्तम शेठ भोईर,जयवंत पाटील, सुनिल थोरवे,चंद्रकांत पाटील,राजेश पाटील,जयेश पाटीत,समवेत शेकाप चे कार्यकर्ते यांनी केले.यामुळे 5 फेब्रुवारी ला गुलाळ हा परिवर्तन विकास आघाडीच्या खांद्यावर पडेल असा विश्वास यावेळी मतदार राजानी व्यक्त केला.तसेच प्रत्येक गावात उमेदवार यांच्या घोषणांनी हा परिसर गर्जनामय होत होते. असल्याचे पहावयास मिळाले.



0 Comments