मैत्री चषक, नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन, उद्योजक यशवंत शिंदे,मारुती ढवाळकर यांचा पुढाकार

      मैत्री चषक, नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन, 

उद्योजक यशवंत शिंदे,मारुती ढवाळकर यांचा पुढाकार 


माय मराठी न्यूज : वृत्तसेवा                                        माजगाव /वारद  : ९ मार्च,


                 मैत्री चषकांचे आयोजन उद्योजक मारुती ढवाळकर, यशवंत शिंदे यांच्या वतीने नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन आंबिवली येथिल पीपीएल कंपनीच्या समोर असलेले सोमाणी शेठ मैदान येथे  घेण्यात आले.ह्या स्पर्धेत या परिसरातील २७  नामवंत संघानी सहभाग नोंदविला,अतितटीच्या सामन्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तळेगाव संघ, द्बितीय क्रमांक धामणी संघ तृतीय क्रमांक खरसुंडी तसेच या स्पर्धेत  सहा क्रमांक काढण्यात आले.
               ह्या सामन्यात अंतिम विजेत्यास प्रथम  क्रमांकास एक लाख,रुपये,द्वितीय क्रमांक पन्नास हजार तर तृतीय, चतुर्थ,पाच,सहा क्रमांक पंचवीस हजार रुपये, व चषक देण्यांत आले.या सामन्यात धामणी संघाचा  पराभव करून तळेगाव ने प्रथम क्रमांक पटकावले.तसेच तृतीय क्रमांक खरसुंडी यांनी पटकाविले.चतुर्थ टाकेगांव, पाचवा- होराळे, सहावा - खरसुंडी या संघाने जिंकले.

              विजेत्या संघास आकर्षक चषक,देण्यांत आले.तसेच उत्कृष्ट फलंदाज - साईराज धामणी,कूलर व ट्रॉफी,गोलंदाज - अक्षय धामणी कूलर व ट्रॉफी, ,मालिकावीर अभी कड़पे-तळेगाव एलइडी टीवी व ट्रॉफी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक-राजू (वड़गांव) ट्रॉफी देण्यांत आले.या क्रिकेट सामन्यांचे समावोलोचन प्रकाश पाटील, अशोक मालकर,संतोष चौधरी, समीर सोमणे,यश मालकर ,सुरज हातमोडे,यांनी केले.तसेच "पंच"म्हणून संदीप गायकवाड, राजेश भोईर, हरीश कराळे,गुणलेखक रोहित पवार,रविंद्र पाटील,अतुल लबडे,सुरेश ढवाळकर,विजय काठावले यांनी केले.त्याच बरोबर मैत्री चषक पाहण्यासाठी या परिसरातील सरपंच,उप सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा प्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

मैत्री चषक, नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन,   उद्योजक यशवंत शिंदे,मारुती ढवाळकर यांचा पुढाकार