गोरठण बु.येथे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव,दीपोत्सवाच्या माध्यमातून सांगता
माय मराठी न्यूज : वृत्तसेवा
गोरठण बु.: २ एप्रिल,
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला जय हनुमान ह्या गर्जनाने हा परिसर दुमदुमू गेल्याचे पाहावयास मिळाले.ग्रामस्थ मंडळ श्री हनुमान मंडळ व महिला मंडळ गोरठण बु.यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले.गेली अनेक वर्ष या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात असून ही मूर्ती स्थापनेची आख्यायिका अशी सांगितली जाते की माणिक गडावर हनुमानाची मूर्ती सापडली असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.आठ ग्रामस्थ लाकडे आण्यासाठी या परिसरात गेले तेथे त्यांना ही मूर्ती निदर्शनास आली.मात्र घरी आल्यानंतर या ठिकाणी घेऊन जाऊन माझी स्थापना करा असा स्वप्नात दृष्टांत दिल्यामुळे ग्रामस्थानी या गावामध्ये या ठिकाणी मंदिर बांधून हनुमंताची स्थापना करण्यात आली.
गेले अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी जोपासली जात असून,हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या पूजा,सत्यनारायण महापूजा,माहाप्रसाद,पालखी सोहळा,तसेच भजन,कीर्तन,हरिपाठ,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,आदी कार्यक्रम या उत्सवाच्या निमित्ताने संपन्न झाले.या निमित्ताने काल दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,वारकरी
गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा उपक्रम साजरा होत असतानां वावोशी व छत्तीशी विभागातील ग्रामस्थ या कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात.तसेच दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात अनेक कार्यक्रम संपन्न झाले.तसेच आज हनुमंत जन्माचे कीर्तन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले.हा कार्यक्रम ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील ( इतिहासाचार्य ) संस्थापक - माध्यमिक शिक्षण संस्था (गुरुकुल महाड )यांच्या माध्यमातून करण्यात आले.



0 Comments