संताच्या चरणावर मस्तक ठेवले तर मानवी जीवन धन्य होतो. ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील
माय मराठी न्यूज : वृत्तसेवा
वारद : २३ एप्रिल,
जीवनात ईश्वराची प्राप्ती आवश्यक आहे.यामुळे जीवनात धन्यता प्राप्त होत असते.संत तुकाराम महाराज धन्य हा शब्द आवडीचा आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांचा बरवा हा शब्द आवडीचा आहे. यामुळेच महाराज प्रत्येक अवयवाला धान्यता मानत असतात.आपल्या वाचे मधून रामाचे गुणगान यावे तो खऱ्या अर्थाने आपला धन्य दिवस असा मानावा लागेल. देह उत्तम असताना या परमेश्वराचे गुणगान गावे,कारण संतांच्या चरणावर मस्तक ठेवले तर जीवन धन्य होत असतो.असे प्रतिपादन अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव सोहळा वारद येथे काल्यांच्या किर्तनात ह.भ.प. रामदास भाई महाराज पाटील बोलतांना व्यक्त केले.
काल दीपोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक,वा रकरी आश्या विविध माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होते.या अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव आयोजन हनुमंत विष्णू लभडे, मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले.हे पाचवे वर्ष असल्यामुळे या कार्यक्रमास यात्रे सारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी पसायदान घेत,मुखात विठ्ठलाचा गजर,आणी टाळ्यांचा कडकडाट ने हा परिसर दुमदुमून गेला.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले.
यावेळी ते पुढे म्हणाले की मानवी जीवनात तीन गोष्टीला खूप महत्त्व आहे, आवश्यक,अनावश्य आणि अत्यावश्यक तसेच अन्न,वस्त्र,निवारा, या प्रमुख गरजा आहेत.कीर्तनात टाळी वाजवणारा घटक म्हणजे उत्तेजक आहे.जांभई, झोप कीर्तनामध्ये अनहित आहे.अत्यावश्यक हा शब्द सातत्याने वापरला जातो ॲम्बुलन्स,मेडिकल यासाठी हा शब्द महत्त्वाचा ठरत आहे.तसेच कुणाचेही मनोधैर्य खच्ची न करता जीवनात परमेश्वराचे प्राप्ती करणे अत्यावश्यक आहे.
शेतकरी, जवान यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला.देह व्यवस्थित आहे तोपर्यंत संतांचे गुणगान करा. पैसा आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही.मात्र उच्च प्रतीचा सन्मान देत असतो.तसेच समाधान हे कीर्तनामध्येच मिळू शकते. त्याचबरोबर जीवनात नात्याला खूप महत्त्व आहे. मात्र माणसे मागून निंदा करतात समोरून नाही, म्हणून प्रत्येकाने चांगले कर्म करा कारण शब्दाचा अर्थ सातत्याने बदलत असतो. त्याचबरोबर श्रीकृष्णाचे गोपीका बरोबरचे नाते आपुलकीचे होते. असे मत काल्याच्या कीर्तनामध्ये व्यक्त केले.






0 Comments