राजाराम जाधव यांच्याकडे शिक्षक परिषद खालापूर तालुका अध्यक्ष पदाची धुरा
३१ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य; हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान
माय मराठी न्यूज : वृत्तसेवा पाताळगंगा : ४ ऑक्टोबर,
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शाखा खालापूर तालुकाध्यक्षपदी राजाराम भगवान जाधव यांची बिनविरोध निवड जिल्हा परिषद शाळा खालापूर येथे झालेल्या बैठकीत नूतन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांचे निवडीचे स्वागत होत आहे.
त्यांनी १९ जून १९९५ रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा वाजापूर, पनवेल येथे शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. या शाळेत त्यांनी तीन वर्षे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. त्यानंतर खालापूर, माजगाव, धामणी, कुंभिवली आणि वडवल येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. सध्या ते जिल्हा परिषद शाळा कलोते रयती येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ३१ वर्षांपासून ज्ञानदान ज्ञानदानाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडले असून, अनेकजण विविध क्षेत्रांत तर काही सरकारी सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रवासातून शिक्षकाचे समाजातील महत्त्व अधोरेखित होते.नूतन कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष राजाराम जाधव, तालुका कार्यवाह डॉ. अजय देशमुख, तालुका कार्याध्यक्ष अमसिद्ध बिराजदार, तालुका कोषाध्यक्ष भारत आढे, तालुका संघटनमंत्री प्रदीप चव्हाण आणि तालुका महिला आघाडी प्रमुख रेखा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट राज्य शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे,जिल्हा अध्यक्ष उदय गायकवाड, जिल्हा कार्यवाह विजय पवार,राज्य प्रसिद्धीप्रमुख वैभव कांबळे,निरीक्षक जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खामकर,महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून ही अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली असे समजते.

0 Comments