भाजपाचे युवानेते किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश - कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विकास कामांकरिता 100 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर

 

समाधान दिसले : प्रतिनिधी                                            खालापूर : २२ मार्च कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी अनेक लोकप्रतिनिधी व राजकीय नेते मंडळी आपआपल्या परीने पाठपुरावा करित असताना आपल्या मतदारसंघातील गावाच्या समस्या जाणून घेत भाजपाचे युवानेते किरण ठाकरे यांनी या समस्या मार्गी लागण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांकरिता 100 कोटी पेक्षा जास्त निधी मार्च अर्थसंकल्प अधिवेशन 2023 मध्ये मंजूर झाल्याने किरण ठाकरेंच्या प्रयत्नातून अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लागणार असल्याने भाजपाचे युवानेते किरण ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.



        तर मार्च अर्थसंकल्प अधिवेशन 2023 मध्ये 100 कोटी पेक्षा जास्त मंजूर करुन दिल्याबद्दल भाजपा युवानेते किरण ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे भाजपा कर्जत खालापूर विधानसभेच्या वतीने आभार मानून सर्व मंत्री महोदयांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.


      भाजपा पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील युवानेते किरण ठाकरे हे कर्जत खालापूर मतदारसंघाचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी भाजपा पक्षाच्या मंत्र्यांच्या सहकार्याने वेळोवेळी पाठपुरावा करित असताना किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आल्याने मार्च 2023 मधील अधिवेशनात 100 कोटी पेक्षा निधी मंजूर झाल्याने या निधीच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लागणार असल्याने किरण ठाकरे यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे. तसेच किरण ठाकरे या एक सामान्य भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याने 100 कोटी पेक्षा जास्त निधी कर्जत खालापूरच्या विकास कामांसाठी मिळाल्याने किरण ठाकरे यांच्या प्रयत्नाचे सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करित आहे.


            तर किरण ठाकरे यांच्या रुपाने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाला नव्या दमाचा युवा नेतृत्व मिळाल्याने भाजपाच्या गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून किरण ठाकरे यांच्या प्रयत्नातून अजून भरघोस निधी मिळावा यासाठी सर्वसामान्य नागरिक किरण ठाकरेंना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देत आहे.


















Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार