शहरातील खोपोली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या समाज मंदिर रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतल्याने, नागरिकांनी मुख्याधिकारी अनुप दूरे यांचे आभार व्यक्त केले आहे.

 


जयवंत माडपे : प्रतिनिधी
खोपोली : २२ मार्च,शहरातील मुख्य बाजारपेठ, दीपक चौक तसेच समाजमंदिर रस्ता ,खालची खोपोली या भागात मोठ्या प्रमाणात फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांनी गाड्या लावून रस्ता अडवल्यामुळे, नागरिकांनी नगरीपरिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. अनेकदा या विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थचा  प्रश्न निर्माण झाला होता. खालची खोपोली येथे तर अनेक व्यापाऱ्यांनी बांबूच्या टपऱ्यात उभ्या करून जागेवर हक्क सांगण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे नगरपरिषद प्रशासन करते काय ?असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होता. 
              विद्यमान मुख्याधिकारी यांनी विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या तसेच प्राप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारी यावरून कठोर भूमिका घेत संपूर्ण बाजारपेठ समाज मंदिर रस्ता, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फळ व भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला, यामुळे परिसरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या. सदरच्या कारवाया कायमस्वरूपात की तात्पुरत्या असाही प्रश्न विचारला जात होतो, या संदर्भात मुख्याधिकारी अनुप दुरे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की ही कारवाई कायमस्वरूपी असणार आहे 
             ,तसेच इतर भागातही अशा स्वरूपाची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बाजारपेठेतील ज्या व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील रस्ता अडवण्यासाठी नाम फलक किंवा वाढीव बांधकाम केले आहे अशा व्यापारांनाही आम्ही नोटिसा पाठवल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईमुळे शरीरातील रस्त्यांनी मात्र मोकळा श्वास घेतला अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात