नेरळ रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणे प्रवाशाच्या जीवावर बेतले,एकनाथ लदगे यांचा उपचार दरम्यान मृत्यू

 


अजय गायकवाड : प्रतिनिधी
नेरळ /कर्जत ३० मार्च, 
     
         नेरळ रेल्वे स्थानकात रूळ ओलांडण्याचा नादात बसलेल्या ट्रेनच्या धडकेत प्रवाशाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.एकनाथ लदगे असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी जात असतानाच स्थानकातच ट्रेनची धडक बसली असल्याची घटना काल सायंकाळी घडली होती.
        २९ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडवली येथील एकनाथ लदगे हे प्रवासी नेरळ रेल्वे स्थानकातून कर्जत दिशेने जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाई गडबडीत होते.मात्र यासाठी लदगे यांनी पादचारी पुलाचा वापर न करता स्थानक क्रमांक २ वरून ते १ वर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा तयारीत असताना समोरून येणारी ट्रेन त्यांनी पाहिली नसल्याने त्यांना ट्रेनची जोरदार धडक बसली होती,या दरम्यान लदगे हे रक्ताच्या थारोळ्यात स्थानकात पडून होते,दरम्यान यावेळी त्यांचे कुटुंब देखील त्यांच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले होते.


             घटनास्थळी स्थानकात बघ्यांनी एकाच गर्दी केल्याने रेल्वे पोलीस नाना कसबे,ASI संजय भोईर तर RPF चे चव्हाण यांनी कार्यतत्परता दाखवत लदगे यांना ताबडतोब नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले होते.जखमी लदगे यांना अधिक उपचारासाठी नंतर MGM रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले,मात्र उपचार सुरू असताना गंभीर दुखापतीमुळे लदगे यांचा आज पहाटे मृत्यू झाला.


           दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून नेरळ स्थानकात अधिकच्या पादचारी पुलांचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक कामे हातात घेतली जात आहेत. मात्र रूळ ओलांडणे धोक्याचे असताना प्रवासी रूळ ओलांडत असल्याने असे अपघात समोर येत आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर