दीपक जगताप : प्रतिनिधी खालापूर : ३१ मार्च,आज रायगड सह आनेक ग्रामीण भागात तसेच देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आली. विशेष म्हणजे या परिसरातील भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.रामनवमी अर्थात राम जन्मोत्सव गेल्या आठ दिवसांपासून या उत्सवाची रेल चेल सुरु होती.या निमित्ताने या मंदिराला सजविण्यात आले.फुलाचा सुगंध आणी मंदिरात असलेली श्री राम,लक्ष्मण,माता सीता यांच्या मुर्ती या निमित्ताने प्रखर तेजाने दैदीप्यमान मान झालेल्या पहावयास मिळाल्या.
पहाटे पासून निंबोडे येथे उत्सवांची जयंत तयारी सुरु करण्यात आली.काकडा आरती पासून सुरुवात करुन पहाट ही श्री रामाच्या नामस्मरण आणी त्यांच्या घोष वाक्यांनी दुमदुमून गेल्यांचे पहावयास मिळाले.त्याच प्रमाणे १० ते १२ या वेळेत ह.भ.प. दिलीप महाराज राणे ( हळीवली कर्जत ) यांचे सुंदर असे कीर्तन झाले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहेर वासी महिला वर्गांचा सत्कार समारंभ हा कार्यक्रमाचे घेण्यात आला.कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आवर्जून उपस्थित राहत असतात.ही परंपरा अनेक वर्षापासून जोपासली गेली असल्यांचे सांगण्यात आले.
सायंकाळी हरिपाठ व रात्री श्री रामाची पालखी निंबोडे या गावामधून फिरविण्यात आली.यावेळी ढोल ताशाच्या गजरात आणी डिजे च्या ठेक्यावर महिला वर्ग आणी तरुण वर्गानी नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. त्याच बरोबर मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसाद म्हणून ठेवण्यात आला होता.विशेष करुन आ दिवसभर या कार्यक्रमाची लगबग पहावयास मिळाली. आणी श्री राम उत्सवांची सांगता करण्यात आली.
0 Comments