दीपक जगताप : प्रतिनिधी खालापूर : २२ मार्च , महानगर गॅस लिमिटेड मुंबई खालापूर तालुका व पनवेल तालुका अपंग संघटआना यांच्या संयुक्त विद्यमाने 262 हुन अधिक दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणे वाटप शिबीर संपन्न झाले.महानगर गॅस च्या वतिने सी एस आर फंडातून अनेक दिव्यांगासाठी मोफत साहित्य वाटप करण्यात आले.
ह्या वेळी गटविकास अधिकारी श्री बालाजी पुरी,श्री सुशांत राऊत मॅनेजर महानगर गॅस लिमिटेड,विस्तार अधिकारी तांडेल,महाराष्ट्र अपंग संघटना अध्यक्ष श्री साईनाथ पवार,सुधीर ठोंबरे,किरण ठाकरे,रितू ठोंबरे सरपंच चौक,सुहास कदम सरपंच वावंडल ,काशिनाथ पार्टे, कुमार दिसले,निखिल पाटील सदस्य, सुशीला भुईकोट सदस्या,कमलेश तिवारी उपस्थित होते
तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सचिव शिवाजी पाटील, खालापूर तालुका अपंग संघटना अध्यक्ष श्री मंगेश पार्टे ,सुनील पाटील पनवेल संघटना अध्यक्ष,शशांक हिरवे, अशोक तवले,नागबाथ घोडके, अभिजित मुंडे,रामदास काइनकर आदींनी मेहनत घेतली
0 Comments