श्री साबाई माता क्लब कॅरम स्पर्धेच प्रथम मानकरी ठरला अमित वाडकर तर द्वितीय अमित यादव



दीपक जगतात : प्रतिनिधी
खालापूर : २७ मार्च, 
खेळ म्हटले कि कोणतेही असो या मध्ये शारिरीक समवेत बुद्धीचा विकास होत असतो.आज बदलत्या काळात मैदानी खेळ लुप्त होत चालले आहे.कारण मोबाईल चा जन्म झाला आणी सर्व खेळच हिरावून घेतले गेले आहे.लहान मुळे सुद्धा मोबाईल वर अनेक गेम खेळण्यात पसंती दर्शवित असतात.मात्र मात्र खेळ हे प्रत्यक्षात खेळले जावे या उद्दात विचारांतून श्री साबाई माता क्लब  च्या माध्यमातून कॅरम या खेळाचे आयोजन करण्यात आले.यावेळी खालापूर,कर्जत तालुक्यातील कॅरम प्रेमी उपस्थित राहून आपले कौशल्य दाखविले.


                 कॅरम चा खेळ प्रथमच  या क्लब ने आयोजित  केल्यामुळे  या स्पर्धेचे अनावरण माजी तालुका प्रमुख उमेश गावंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅरम खेळणारे आणी प्रेक्षक यांचा उदंड प्रतिसाद पाहावयास मिळाले.यावेळी ३२ कॅरम खेळाडू ने सहभाग नोंदविला होता.ह्या स्पर्धेत खोपोली येथील अमित वाडकर प्रथम तर खालापूर मधील अमित यादव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.तसेच तृतीय क्रमांक कृष्णा वाघमारे कर्जत तर चतुर्थ क्रमांक एजाज मुजावर रसायनी यांनी पटकाविले.


             हा कॅरम चा यशस्वी होण्यासाठी या क्लब च्या सदस्यांनी उत्तम अशी मेहनत घेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.विशेष म्हणजे प्रथमच या खेळायाचे आयोजन करण्यात आल्यामुळे तरुणांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली होती.या कॅरम या खेळ यशस्वी होण्यासाठी अमित यादव,राजू देसाई ,योगेश करंजकर ,अनिल चाळके,गणेश लोहार,सौरभ मुळेकर आदींनी मेहनत घेतली



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर