कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कुमारी खुशी सचिन हजारे Zee मराठी चित्र गौरव सर्वोउत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित,

 


अजय गायकवाड : प्रतिनिधी
कर्जत / नेरळ : २८ मार्च,
      कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. झी मराठी चित्र गौरव पुरस्कार सोहळा अलिकडेच मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात वेड ह्या मराठी चित्रपटात खुशीच्या भूमिकेतील  कर्जतच्या कुमारी खुशी सचिन हजारे हीला Zee मराठी चित्र गौरव सर्वोउत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,खुशीच्या या यशात कर्जत करांची देखील मान उंचावली गेल्याने तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
           दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या 'वेड' या मराठी चित्रपटाने सर्व प्रेक्षक रसिकांच्या मनाला एक प्रकारे वेड लावले,चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तर वीकेंडला प्रेक्षक थिएटरवर गर्दी करत होते. या चित्रपटाचे यश त्यातील कलाकार मंडळींचे आहे. रितेश आणि जेनेलिया जेवढे या चित्रपटात यशस्वी ठरले तेवढेच सहाय्यक कलाकार सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.त्यामुळे अशोक सराफ, जिया शंकर यांचेही मोठे कौतुक झालेच परंतु त्यासोबतच बालकलाकार खुशी हजारे हिच्या सुद्धा अभिनयाचे मोठे कौतुक करण्यात आले होते. 
           खरं तर खुशीचा येण्याने सत्या आणि श्रावणीचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले होते.त्यामुळे खुशी हजारे ही बालकलाकार बॉलिवूड सृष्टीत झळकली. तिने वेड चित्रपटात खुशीचे पात्र निभावले.पहिल्याच दिवशी खुशीने तिच्या अभिनयाने रितेशचे देखील मन जिंकून घेतल्याचा किस्सा हा स्वतः रितेश देशमुख यांनी सांगितला होता.कुमारी खुशी ही रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राहणारी मुलगी,कर्जत तालुका हा विविध क्षेत्रातील कलाकारांची  रत्नाची खान म्हणायला हरकत नाही आजवर असे अनेक कलाकार या कर्जतच्या मातीत तयार झालेत आणि त्यांचे नाव सातासमुद्रापार घेतले जात आहेत.
          नुकताच 2023 Zee मराठी चित्र गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले,यावेळी वेड चित्रपटातील भूमिकेसाठी कर्जतच्या कुमारी खुशी सचिन हजारे हिची सर्वोउत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराने कर्जत करांची देखील मान उंचावली गेली आज खुशीवर कर्जतच्या काना कोपऱ्यातून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे,काहींनी तिचा मोबाईलवर स्टेटस सुद्धा ठेवला आहे. तिचे यश पाहून तिला जेष्ठ नागरिक तरुण तरुणींनी देखील सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर