कृष्णा भोसले : प्रतिनिधी
तळा : २९ मार्च ,
ग्रामीण भागातील मुले खूप हुशार असून काही वेळा हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांच्या कलेला वाव मिळत नाही.आणी काही वेळा ही त्यांच्याजवळ असलेली कलेचा सराव होत नसल्यामुळे हळु - हळु कमी होवून लोप पावत आहे. तळा तालूक्यातील फळशेत कर्नाळा गावातील असलेला किशोर आर्डे, हा उच्च शिक्षित असून एक आवड म्हणून हा चित्रकलेचा छंद जोपासला गेला.शिक्षण घेत असतांना चित्र काढण्याची कला अवगत केली असून आजपर्यंत शेकडोहून अधिक चित्र तीने काढली आहे.
यामध्ये गणपती,छत्रपती शिवाजी महाराज,गरभा नृत्य करणाऱ्या मुली,विद्यार्थी,निसर्ग चित्र, प्राणी विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटण्याची कला अवगत असल्यामुळे त्यांच्या या कलेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.त्यांने काढलेले चित्र पाहून पाहुन आनेकांनी त्यांच्यावर कौतुकाची धाप मिळत आहे.मात्र हक्कांचे व्यासपीठ मिळत नसल्यांची खंत त्यांने व्यक्त केला. आहे.व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटत असतांना ते चित्र अत्यंत मनमोहन असल्यामुळे आजपर्यंत अनेकांनी स्वताचे रेखाचित्र काढून घेतले आहे.
ही चित्रकलेची आवड शाळेमध्ये असतांना जडली आणी विशेष म्हणजे त्याच्या मध्ये असलेली ही कला अशिच सुरु ठेवण्यासाठी घरातील सदस्य सहकार्य करीत आहे.मात्र वडील नसल्यांची खंत मनाला स्पर्श करून जात आहे. आजवर शेकडो रेखाचित्र काढली हा उच्च शिक्षित असून कामानित्ताने मुंबई जात असून सध्या दिवा येथे वास्तव्य करीत आहे.चित्रकलेची आवड म्हणून हा छंद जोपासला असून नुकताच तळा येथिल पत्रकार कृष्णा भोसले यांचे हुबेहूब चित्र रेखाटल्यांने त्यास भेट दिली
0 Comments