1961सालचा पोशिर नदी वरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक.पुलाचे भाग निखळले.सवित्रीनंदिवरी घटना करते अस्वस्थ.

 


अजय गायकवाड :  प्रतिनिधी                                       कर्जत : २२ मार्च,   1961 साली बांधण्यात आलेल्या पोशिर नदीवरील पूलाची दुरवस्था झाली,पूल कमकुवत होवून या पुलाचा लोखंडी भाग ही बाहेर आला.पुलाला मुख्य आधार दिलेले खांब ही निखळलेल्या अवस्थेत  आहेत त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे दिसत आहे,रोजचे हजारो टन माल वाहून नेणारे कंटेनर तर लाखो प्रवास करणारे वाहन यामुळे येथे महाड येथील सावित्री नदीवरील पुलाची दुर्घटनेची पुनरावृत्ती होवू नये म्हणून या पुलाची पाहणी करून हा पूल नव्याने लवकरात लवकर बांधण्यात यावा म्हणून मागणी पुढे येत आहे.




             कर्जत मुरबाड हा राष्ट्रीय महामार्ग तर नेरळ कळंब या राज्य मार्गावरून येत असलेल्या कळंब गावाच्या हद्दीतील पोशिर नदीवरवर बांधण्यात आलेल्या  ह्या पुलाला जवळजवळ 50 हुन अधिक वर्षाचा कालावधी लोटला,पोशिर नदीवरील हा पुलावरी राष्ट्रीय महामार्ग पुढे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला गेला त्यामुळेचं,रोजचे हजारो वाहने या मार्गावरून वाहतूक करीत असल्याने येथे कायम वाहनांची वर्दळ दिसून येते,जवळचा आणि अवघड वाहनांसाठी सुरक्षित असा हा राष्ट्रीय महमार्गावरील पुल मात्र जुना झाल्याने येथून वाहतुक करण्यासाठी धोकादायक बनला.हा पुल जीर्ण होत आल्याने ठिकठिकाणी पुलाचे भाग निखळून लोखंडी भाग वर आले आहे,तर पूल चारही बाजूने कमकुवत झाल्याचे चित्र आहे.तर पुलाला झाडांच्या मुळाने देखील ठिकठिकाणी घेरल्याने चित्र आहे,एकूणच अवघड वाहनाच्या वाहतुकीमुळे येथे पुलाला हादरे बसत असल्याचे येथील स्थनिक ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोईर व जेष्ठ नागरिक चिमन भोईर हे सांगत आहेत,तर पूल केव्हाही पडून मोठी दुर्घटना होवून जीवित हानी होवू शकते,पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीला पाणी असते,मागील काही वर्षा पूर्वी पूल पाण्याखाली देखील गेल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.येथील हा पूल अनेक गाववाड्या पाड्यानां जोडला गेला शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ नेहमीच याच रस्त्याने प्रवास करीत आहेत.




      सध्या या रस्त्याचे काम एमएसआरडीसी च्या माध्यमातून होत असून पुलाची देखरेखीचे काम देखील हाच विभाग पाहत आहे.मागील दीड वर्षे येथील रस्त्याचे काम रखडले होते,ह्या पुलाच्या ठिकाणी बाजूला दुसरा पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलं.एकूणच पूल तयार होण्यास किती कालावधी लागेल हे जरी माहिती नसले तरी मान्सून काळ जवळ येत आहे त्यामुळे पुलाचे काम सुरू होणे एवढ्यात तरी शक्य वाटत नाही त्यामुळे महाड येथील सावित्री नदीवरील जुना पूल असाच एका रात्रीत नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता,यात अनेक निष्पाप नागरिक वाहून जाऊन मृत झालीत तर  काहींचे मृतदेह सुद्धा सापडली नाहीत.त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये एवढीच अपेक्षा.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण