खालापूर - पनवेल तालुक्यातील दिव्यांगांना महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून विविध वस्तूंचे वाटप.२६८ दिव्यांगाना साहित्य वाटप

 



समाधान दिसले ,प्रतिनिधी
खालापूर : २६ मार्च,
            महानगर गॅस लिमिटेड मुंबई - सी.एस.आर. फंड योजने अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड मुंबई यांच्या सहकार्याने सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे राज्यसचिव शिवाजी पाटील याच्या प्रयत्नाने पनवेल - खालापूर तालूक्यातील दिव्यांगाना वावंढळवाडी येथे 268 दिव्यांगाना साहित्य वाटप करून समाजात वावरण्यासाठी आशेचा किरण दिला आहे.
                 तर यामध्ये मोटोराईज सायकल, साधी सायकल, कुबड्या, अंध इलेक्ट्रॉनिक काठी, स्मार्ट फोन, मुख बधिरांसाठी कानाची मशीन अशा साहित्याचे वाटप केले असून कंपनीने गेल्या चार वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील जवळपास 2000 हून अधिक बांधवाना मदतीचा हात देऊन खारीचा वाटा उचलला आहे. तर यावेळी तहसीलदार आयूब तांबोळी, जिल्हाध्यक्ष साईनाथ पवार, अम्लिकोचे कमलेश यादव, महानगर गॅस लिमिटेड मुंबईचे सुशांत रावत, पिनाकीन वाघेला, प्रियंका दळवी, पंचायत समिती खालापूर गट विकास अधिकारी बालाजी पुरी, चौकचे सरपंच रितू ठोंबरे, वावंढळ सरपंच सुहास कदम, लोधीवळी सरपंच पूजा तवले, उपसरपंच समीर दळवी, विस्तार अधिकारी शैलेश तांडेल, सामाजिक कार्यकर्ते रामदास काईनकर, किरण ठाकरे काशिनाथ पारठे, सुधीर ठोंबरे आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
              तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग कल्याणकारीचे राज्य सचिव शिवाजी पाटील, नवी मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शशांक हिरवे, खालापूर तालुकाध्यक्ष मंगेश पार्टे, तालुका सचिव कल्पेश तवले, पनवेल तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, खालापूर उपाध्यक्ष रवींद्र भोईर, अभिजीत मुंढे, नागनाथ घोडके, कमलाकर लबडे यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर