रानसई आदिवासी वाडीत जातीचे दाखल वाटप शिबिर संपन्न - जवळपास 150 हून अधिक बांधवांनी काढले दाखले

 


एस.टि.पाटील  प्रतिनिधी
वासरंग : २६ मार्च ,
         आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळविण्यासाठी अनेक परिश्रम करावे लागत असल्याने रानसई आदिवासी वाडीतील ग्रामस्थांची समस्या ठाकरे गट युवासेनेचे तालुका अधिकारी महेश पाटील यांनी लक्षात घेऊन उरण सामाजिक संस्था आणि परिवर्तन सामाजिक संस्था यांचा पुढाकारातून जातीचे दाखले वाटप शिबीर रानसई आदिवासी वाडी आयोजित केल्याने या शिबीर आदिवासी वाडीसह परिसरातील जवळपास 150 हून अधिक ग्रामस्थांनी जातीचे दाखले काढून घेतल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तर युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, उरण सामाजिक संस्था आणि परिवर्तन सामाजिक संस्थेच्या कामगिरीचे आदिवासी बांधवांनी कौतुक केले.
                तर यावेळी युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, रानसई आदिवासीवाडी ही आदर्श वाडी करण्याचा संकल्प असून येथील ग्रामस्थांनी समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करित आहे, तसेच आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून समाज प्रबोधन माहिती देत त्याचा विकास कसा होईल यावर भर देत असल्याने येथील ग्रामस्थ अन्याया विरुद्ध लढण्यासाठी सज्ज होत आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये अमुलाग्र बदल होऊ लागल्याने समाजसेवा केल्याचे मनाला समाधान वाटू लागले आहे, असे मत महेश पाटील यांनी व्यक्त केले.


          कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, उप विभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार आयुब तांबोळी, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील रानसई आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले वाटप करण्यात आले असून उरण सामाजिक संस्था आणि परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील यांच्या प्रयत्नातून जातीचे वाटप शिबीर संपन्न झाले. हा शिबीर यशस्वी करण्यासाठी महेश पाटील व प्रमिला पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच मंडळ अधिकारी कामत, तलाठी कावरखे व इतर तलाठी आणि त्यांच्या टीमने उत्तम कामगिरी बजावल्याने आदिवासी बांधवांना सहज सोप्या पद्धतीने जातीचे दाखले मिळाल्याचे पाहायला मिळाले.
        तर आदिवासी विकास निरीक्षक सोनवणे यांनी आदिवासी विकास प्रकल्प पेण तर्फे विविध योजनांची माहिती सोप्या शब्दात दिली. या शिबिरात जवळपास 150 हून अधिक ग्रामस्थांनी आपले दाखले काढून घेतल्याचे पाहायला मिळाले असून महेश पाटील हे आदिवासी समाजासाठी सातत्याने विविध माध्यमातून काम करित असल्याने उपस्थित मान्यवर व आदिवासी बांधवांनी विशेष कौतुक केले.
          तसेच हा शिबीर यशस्वी होण्यासाठी दत्ता शिरसाट, के.आर.पाटील, रोहित जाधव, नवश्या वाघमारे, सरिता जाधव व इतर आदिवासी बांधवांनी परिश्रम घेत महसूल विभाग खालापूर यांचे विशेष आभार राजेंद्र मढवी व रत्नाकर घरत यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण