जुन्या मित्रांच्या आठवणी झाल्या ताज्या,सोशल मिडीयांच्या माध्यमातून २१ वर्षानी विद्यार्थी एकत्र,जोत्सना उत्तेजकर,वर्षा भौऊड यांच्या विचांरातून ,निलेश कथारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन

 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                     १६  एप्रिल , 

           दहावी चे शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा खरसुंडीचे अनेक मित्र एकमेकांपासून दुरावले गेले होते.मात्र आपण हे सर्व मित्र एकमेकांना भेटणार नाही हाच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रेंगाळत होते.मात्र जे स्वप्नात सुद्धा शक्य होणार नाही.ते सत्यात उतरले अखेर २१ वर्षांनी सोशल नेटवर्क च्या माध्यमातून सर्व मित्र वावर्ले येथिल येवले फार्म हाउस  या ठिकाणी एकत्र आले.यावेळी विद्यार्थीनी  प्रत्येकांची  मैत्री ही अशिच घट्ट रहावी या साठी एकमेकांनी शुभेच्छा दिल्या.   


         शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक जण आपल्या प्रवासाला लागला होता.मात्र जुणे मित्र एकत्र येतात तेव्हाचा खर-या अर्थाने तो आनंदाचा तो क्षण शब्दाने वर्णवू शकत नाही.अशिच स्थिती या मित्रांची झाली होती,शाळेमध्ये शिक्षण घेत असताना रोज भेटी गाठी होत असायच्या मात्र शिक्षण पूर्ण झाले,आणी त्या शाळेतील मित्रांच्या आठवणीने फक्त दिवस जात असायचे. अखेर ही प्रतिक्षांची भावना संपली आणी सर्व मित्र एकत्र आले.     

                  यावेळी शाळेतील झालेल्या जुन्या गोष्टीचा उजाळा निर्माण झाला.त्या वेळचे ते क्षण या आठवणी पुन्हा एकदा या आठवणी ताज्या झाल्या. आज आपण सोशल नेटवर्क च्या माध्यामतून एकत्र आलो.आपल्याला या शोशल नेटवर्क  वाईट परिणाम होत असल्याचे अनेकांने मत असते.मात्र याचा शोशल नेटवर्क च्या माध्यामातून आपण  २१   वर्षातून एकत्र आल्याने मत ,या मित्रांनी व्यक्त केले.   

             यावेळी नितिन मोरे,प्रविण म्हामुणकर,गंगाराम पाटील,अशिष खोपकर,निलेश कथारे,निलेश पाटील,हेमंत चव्हाण,प्रभाकर चालके,मंगेश गमरे,रमेश काठावले,बाजीराव ढवालकर,कैलास फराट,तुकाराम पाटील,सुनिल महाब्दि,मनोहर पाटील,स्वप्निल देवघरे,जोत्सना उत्तेकर,मीना गायकवाड,रोहिणी गायकवाड,सविता मोरे,दिपाली पाटील,वर्षा भोऊड,स्वाती खोपकर  अदि उपस्थित होते.   

                 या संकल्पनेतून जोत्सना उत्तेजकर,वर्षा भौउड यांच्या विचांतुन,निलेश कथारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा गेट टुगेदर यशस्वी होण्यासाठी दोन महिने नियोजन सुरु असल्यांचे उपस्थित विद्यार्थी मित्रांनी प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण