अजय गायकवाड नेरळ /कर्जत ११ एप्रिल,
गोवंशीय जनावरांच्या कत्तल प्रकरणात मनसेकडून 10 दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आल्यानंतर नेरळ पोलिसांनी या प्रकरणात दामत गावातील सहा आरोपींना ताब्यात घेतले आहेत.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मंमदापूर आणि दामत ग्रामपंचायत हद्दीला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत शेकडो गाईंची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार पाताळगंगा न्यूज पोर्टल ने उघडकीस आणला होता.यावर विविध संघटना पुढे येत आक्रमक झाल्या होत्या.तर आरोपींना पकडून योग्य ती कारवाई करावी म्हणून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांना निवेदन देखील देण्यात आले होते.यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आक्रमक भूमिका घेत पोलिसांना निवेदन दिले होते.
मनसेचे जिल्ह्या अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तर पाताळगंगा न्यूज पोर्टलचे प्रतिनिधी यांचे आभार मानून या प्रकरणात दोषींना पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती तर असे न केल्यास सर्व संघटना एकत्र येवून कर्जत तालुका बंद ची हाक देखील दिली होती.परंतु या प्रकरणात आता नेरळ पोलिसांनी दामत गावातील सहा आरोपी यांना ताब्यात घेतले आहेत.मुसा नसीम नजे,,सलीम मुस्ताक नजे,इस्माईल असगर नजे,नसीम हमीद नजे,असमद अफबुल रहेमान टीवाले,पर्व्हेज गुलाम नबिंन नजे असे अटक केलेल्यांची नावे पोलिसांन कडून सांगण्यात आली आहेत.दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन देखील मंजूर झाल्याचे समजतंय.
0 Comments