ब्रेकींग!-खांडस मध्ये गारपीटीसह मुसळधार पाऊस.गडगडाटी पावसाने गारांचा खच



अजय गायकवाड                                                             नेरळ / कर्जत ११ एप्रिल

               कर्जत तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे,दरम्यान यावेळी पावसाच्या पाण्या ऐवजी गारांचा जोरात वर्षाव झाल्याचे येथे दिसून आलं.परंतु अचानक झालेल्या या मुसळधार गार पिठी- पावसाने नागरिकांची एकाच तारांबळ उडाली आहे.



         कर्जत तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खांडस या परिसरात गेल्या दोन तासापासून गारपीट सहीत मुसळधार पाऊस पडत आहे.अक्षरश:गाराचा खच यावेळी पाहायला मिळत आहे.अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे तर एकीकडे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात या अवकाळी पावसाने पाणी आणलं.उरला सुरलेला आंब्याचा मोहर बरोबर आंबा पिकाचे नुकसान होणार असून व वीट भट्टी मालकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवस  उष्णतेने माणसाच्या शरीराची लाही लाही होत असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.कशेळे, जामरूग, टेंभरे विभागात वादळी वाऱ्यासह गारपीट,मुसलधार  पाऊस झाल्याचे समोर आलं

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार