रुबी मिल च्या कामगारांने स्विकारले जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नामफलकांचे अनावरण


दीपक जगताप                                             खालापूर : २१ एप्रिल ,


            खोपोली, पाताळगंगा हा औद्योगिकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे कामगारांच्या समस्या गंभीर बनत आहे.समान वेतन समान काम हे धोरण व्यवस्थापक स्विकारत नसल्यामुळे येथिल स्थानिक भूमिपुत्र अथवा या परिसरातील तरुण वर्ग युनियन चे नेतृत्व स्विकारत आहे. खालापूर तालुक्यातील धामणी गावच्या हद्दीतील रुबी मिल येथील कामगारांनी जय भारतीय जनता कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले असून नामफलकाचे अनावरण भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने कामगार वर्ग उपस्थित होते.

                      रुबी मिल कंपनीतील कामगारांवर कोणताही अन्याय होवू देणार नाही.कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे असे सांगितले. त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून,स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीच जय भारतीय जनरल  कामगार संघटनेच्या युनियन ची स्थापना करण्यात आल्यांचे त्यांनी बोलतांना सांगितले.

               यावेळी परिसरातील मान्यवर ,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.जय भारतीय जनरल कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अध्यात्मिक आघाडीचे काशीनाथ पार्टे,जिल्हा उपाध्यक्ष  विठ्ठल मोरे,सनी यादव,प्रवीण जांभळे,इंदरमल खंडेलवाल ,हेमंत नांदे,रामू पवार  यांच्या सह आदी भाजपचे पदाधिकारी यांच्यासह कामगार प्रतिनिधी विशाल लोते,रवींद्र दुधावडे,नरेंद्र वाझे, सुहास गायकर,ज्ञानेश्वर पारंगे,शशिकांत पारंगे व कामगार उपस्थित होते.

जितेंद्र घरत जय भारतीय जनरल कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष


 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर