कंटेनारच्या धडकेत विद्युत महावितरणाचे मोठे नुकसान; विद्युत तारांचे पोल तुटून पडले

 


अजय गायकवाड                                                  नेरळ /कर्जत १५ एप्रिल,

                 नेरळ पूर्व परिसरात कंटेनरच्या धडकेत विद्युत महावितरणाचे आठहुन अधिक विद्युत वाहून नेणाऱ्या तारांचे पोल तुटून पडले आहेत,त्यामुळे येथील विद्युत महावितरणाचे मोठे नुकसान तर झाले शिवाय नेरळ पूर्व परिसरातील विद्युत पुरवठा सकाळ पासून खंडित झाला,तर अपघातात चालक थोडक्यात बचावला,सदर चालकांवर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते,तर नुकसान भरपाई भरून देण्याचे ठरलं असल्याचे समजतंय, नेरळ कळंब या राज्य मार्गावरील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्या लगत असणाऱ्या विद्युत डीपी च्या पोलला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनर जावून धडकला,

           


      यानंतर पुढील लाईन मध्ये असणारे सिमेंट पोल हे खाली कोसळून तुटून पडले तर काही लोखंडी पोल वाकले आहेत,मात्र यामध्ये चालक थोडक्यात बचावला मेन लाईन वरील विद्युत पुरवठा वेळीच बंद झाल्याने चालक बचावला,सध्या नेरळ पूर्व परिसरात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून महावितरण अधिकारी व कर्मचारी काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगत आहेत,काही परिसरातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असून काही परिसरातील  विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याचे समजतंय.तर गरमाईमुळे नकोसे झाल्याने आज सकाळ पासून लाईट ही नसल्यानं नागरिक ही हैराण झालेत.

     दरम्यान एक धक्कादायक प्रकार म्हणजे या कंटेनर चालकातील आणखी एका कंटेनर चालकाने साई मंदिर परिसरात विद्युत वाहक तारा तोडल्या आहेत तर त्याचा पाठलाग करणाऱ्या महावितरण कर्मचारी यांच्यावर त्याने कंटेनर घालण्याचा प्रयत्न देखील केल्याचे समजत यावेळी जागरूक  गावकऱ्यांनी त्याला थांबवले, एकूणच कंटेनर चालक हे नशेत असल्याचे समोर आलं आणि त्यातूनच ह्या घटना घडल्या आहेत,ही घटना पहाटे घडल्याने मोठी जीवित हानी टळली तर अशा मद्यपी वाहन चालकांवर भरपाई घेवून कारवाई होणे गरजेचे आहे.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर