खोपोली खालापुर मधील वाहनाना शेडुंग टोल नाक्यावर सूट मिळावी, भारतीय जनता पार्टीची मागणी,आय.आर.बी व्यवस्थापक यांस निवेदन, भाजपा नेते सुनील गोगटे यांच्या पुढकाराने

 


दीपक जगताप                                                    खालापूर  १५  एप्रिल

 कर्जत  वहानांना मुंबई कड़े जाताना शेडुंग टोल नाक्यावर  सूट मिळते.२ वर्षा पूर्वी भाजपा नेते सुनील गोगटे यांच्या पुढकाराने भारतीय जनता पार्टीने आंदोलन करून कर्जत कराना सूट मिळवून दिली.त्याच प्रमाणे खोपोली,खालापुर मधील वाहनाना शेडुंग टोल नाक्यावर सूट मिळावी भारतीय जनता पार्टी, आय.आर.बी व्यवस्थापक निवेदन देण्यात आले.                          खोपोली,खालापूर येथिल नागरिक काही कामानिमित्ताने पनवेल,मुंबई हॉस्पिटल,तसेच शिक्षण घेण्यासाठी येथे जात असतात. काही वेळा या टोल नाक्यावरुन दिवसांतून दोन ते वेळा प्रवास करावा लागतो. अश्या वेळी टोल भरणे शक्य नसते. मात्र या परिसरातील लोकल नागरिकांना त्यांचा टोल भरावा लागत असतो. यांची झळ त्यांच्या खिश्याला सातत्याने बसत असते.तर काही वेळा पुणे येथे जावे लागते.मात्र असे असले तरी सुद्धा टोल सक्तीने वसुली केले जात आहे.मात्र हे कोठेतरी थांबावे या उद्दात विचारांतून ही भूमिका घेण्यात आली.      

                                     


            खोपोली खालापुर कराना सूट मिळावी यासाठी आज भाजप नेते सुनील गोगटे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते  यांनी शेडुंग टोल नाका येथील आय.आर.बी ऑफिस येथे व्यवस्थापक पेमारे  यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर या बाबद निर्णय घेवू असे आश्वासन सबंधित पदाधिकारी यांस दिले.

   

             याप्रसंगी भाजप नेते सुनील गोगटे उ. रा.जी. ओबीसी सेल उपाध्यक्ष सचिन मोरे उ रा जिल्हा संपर्क प्रमुख माथाडी कामगार रामभाऊ पवार खोपोली शहर सरचिटणीस प्रमोद पिंगळे खोपोली शहर चिटणीस गोपाळ बावसकर खोपोली शहर युवा नेता राहुल जाधवखोपोली शहर सरचिटणीस वैद्यकीय सेल संयोजक विकास नाइक खरपुड़े म.मो.अश्विनी अत्रेखोपोली शहर उपाध्यक्ष म.मो. अपर्णा साठे शक्ती केंद्र प्रमुख संजय म्हात्रे शक्ती केंद्र प्रमुख गिरीश अभाणी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर