अजय गायकवाड नेरळ /कर्जत १६ एप्रिल,
टेंम्पोच्या चाकाखाली आल्याने मोटारसायकलवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला,नेरळ जिते गावात राहणारी योगिता योगेश जाधव तर पती योगेश रामदास जाधव असे अपघातात मृत झालेल्या पती पत्नीचे नाव समोर आलं,ते आपल्या चुलत बहिणीच्या घरी जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.भिवपुरी रेल्वे स्थानकाचे चिंचवली रेल्वे गेट येथे ही घटना घडली, नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या बोरले येथील जिते गावात राहणारे योगिता योगेश जाधव तर पती योगेश रामदास जाधव हे आपल्या गावातील चुलत बहिणीच्या लाखरण या घरी जाण्यासाठी म्हणून मोटारसायकल वरून भिवपुरी मार्गे सकाळी निघाले होते,दरम्यान भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरातील चिंचवली रेल्वे गेट येथे अलीकडे योगेश यांच्या मोटारसायकलला टेंम्पोने मागून धडक दिली,यावेळी मोटारसायकल वरून खाली पडलेल्या योगीताच्या छाती खालील भागावरून टेंम्पोचे मागील चाक जाऊन चालकाने देखील तसाच टेंम्पो फरफटात योगीताच्या अंगावरून नेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला,
तर पती योगेश देखील या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे स्थानिकांनी उपचारासाठी नेण्यात आले होते परंतू त्याचा ही उपचार दरम्यान मृत्यू झाला, योगेश च्या कमरेकडील भागावरून टेंम्पोचे चाक गेल्यानेच त्याचा मृत्यू झाला.यावेळी टेंम्पो चालक हा टेंम्पो रस्त्यातच उभाकरून घटनस्थळाहून फरार झाल्याने उपस्थित नागरिक संतप्त झाली होती तर बघता बघता आणखी नागरिकांची येथे पाहण्यासाठी एकाच गर्दी जमली होती.
सदर घटनास्थळी नेरळ पोलीस हजार होत,मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले होते.तर चालकाला देखील ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं.पती पत्नीचा या अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाल्याने त्यांची लहान चिमुरडी मात्र पोरकी झाली आहेत.
0 Comments