कृष्णा भोसले तळा : १४ एप्रिल
भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ग्रूप ग्राम पंचायत सोनसडे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी दहा वाजता सरपंच माधुरी पारावे यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकून अनेकांना मंत्र मुग्ध केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्षमालीका अर्पण करून जयंती ला सुरवात झाली. यावेळी माजी सरपंच तथा सदस्य परशुराम वरंडे,सोनसडे अध्यक्ष देवजी गावडे, वावेहवेली अध्यक्ष महादेवपारावे, जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग माळी, बौद्ध पंचायत समिती तालुका अध्यक्ष अनंत मोरे, समता सैनिक प्रशांत माळी, चांगुल माळी महीला बंधू भगिनी, ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनंत मोरे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम वरंडे, ग्रामसेवक उमाजी माडेकर, जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग माळी, देवजी गावडे, सरपंच माधुरी पारावे, पत्रकार कृष्णा भोसले आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments