पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा कुंभिवली : १ मे
वाहनांची गर्दी आणि अपघात यावर काही अंशी नियंत्रण ठेवणारे म्हणून गतिरोधकांकडे पाहिले जाते. यामुळे ते अत्यावश्यक आहेत; पण ते करताना नवीन संकटे ओढवून घेण्यात आल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते. असाच प्रकार सावरोली - खारपाडा या मार्गावरील कुंभिवली येथे नव्याने बनविण्यात आल्यांने गतिरोधक या ठिकाणी पहावयास मिळत आहे. मात्र या ठिकाणी अक्षरश: नियमांची पालमल्ली होताना दिसते.
गतिरोधक ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणापासून चाळीस मीटर अंतरावर सुरक्षिततेचे पांढरे पट्टे असतात,किंवा फलक लावण्यात आलेले असतात; पण काही ठिकाणी त्याचा अभाव दिसून येत नाही. यामुळे गतिरोधकांच्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबद्दल नागरिकांच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे.
चौकट :
या ठिकाणी गतिरोधक बसविण्यांची मागणी झाल्यामुळे या ठिकाणी बसविण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षतेच्या काही तुटी राहिलेल्या असेल तर त्या पुर्ण केल्या जातील,या ठिकाणी फलक तसेच पांढरे पट्टे गतीरोधक च्या ठिकाणी मारण्यात येईल
कनिष्ठ अभियंता खालापूर - कर्जत - अजय कुमार अडे
0 Comments